Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • ‘माया’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यापूर्वीच चित्रपटाने घेतली झेप; 24 व्या PIFF मध्ये झाली निवड
मनोरंजन

‘माया’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यापूर्वीच चित्रपटाने घेतली झेप; 24 व्या PIFF मध्ये झाली निवड

Maya Marathi film selected at 24th PIFF before theatrical release

Maya film PIFF selection : नात्यांमधील गुंता आणि मायेची ताकद उलगडणारा मराठी चित्रपट माया हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आदित्य इंगळे दिग्दर्शित माया हा चित्रपट 27 फेब्रुवारी रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. परंतु या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने झेप घेतली.

पिफ मध्ये झाली निवड

माया या चित्रपटाची 24 व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवमध्ये निवड झाल्याची माहिती समोर आली आहे. ही बाब माया या चित्रपटासाठी अत्यंत खास आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच आंतरराष्ट्रीय झेप घेतल्याने चित्रपट पाहण्याची ओढ प्रेक्षकांना लागली आहे. या चित्रपटात मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाचा भावनिक आशय, संवेदनशील कथा आणि दमदार कलाकारांचा अभिनय यामुळे प्रेक्षकांकडून माया या चित्रपटाला वेगळीच अनुभूती मिळण्याची अपेक्षा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mukta Barve (@muktabarve)

तगडी स्टारकास्ट

माया हा चित्रपट शालिनी सिनेमाज आणि नितीन वैद्य प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित करण्यात आला आहे. तर आदित्य इंगळे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. चित्रपटाचे निर्माते डॉ. सुनील दातार, अल्का दातार, नितीन प्रकाश वैद्य हे असणार आहे. चित्रपटाच्या कथा, पटकथा आणि संवादाची धुरा डॉ. समीर वसंत कुलकर्णी यांनी सांभाळली आहे. या चित्रपटात मुक्ता बर्वे सह डॉ. गिरीश ओक, सिद्धार्थ चांदेकर, रोहिणी हट्टगंडी आणि विजय केंकरे हे कसलेले कलाकार मुख्य भूमिकेत आहे.

हे ही वाचा : oscar 2026 : कांतारा चॅप्टर 1 आणि महावतार नरसिम्हा चित्रपटांची ऑस्करच्या शर्यतीत झेप

नात्यातील ताणतणाव, भावनिक संघर्षावर सर्वांवर मायेने मिळालेले उत्तर असा या चित्रपटाचा आशय असणार आहे. या चित्रपटात असलेली जबरदस्त कास्टिंग आणि अभिनयाची ताकद चित्रपटाला अधिकच उंचीवर नेऊ शकते अशी अशा आहे. या चित्रपटाचे छायांकन अमोल साळुंके यांनी केले असून संपादन मयूर हार्ड्स यांनी केले आहे. तर संगीताची धुरा पार्थ उमराणी यांनी सांभाळली आहे. या चित्रपटातील गाणी पार्थ उमराणी आणि अंजली मराठे यांनी गायली आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts