• Home
  • मनोरंजन
  • क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम चित्रपटाने केली 3.90 कोटींची कमाई
मनोरंजन

क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम चित्रपटाने केली 3.90 कोटींची कमाई

Kranti Jyoti Vidyalaya Marathi medium film poster showcasing box office success

Kranti Jyoti Vidyalaya film box office collection : सध्या सोशल मीडियावर क्रांतीज्योती विद्यालय या मराठी चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी हा मराठी शाळांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून या सिनेमाने पहिल्याच विकेंडला तब्बल 3.91 कोटी रुपयांची कमाई करत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

क्रांतीज्योती विद्याल या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर समाधानकारक कामगिरी करून बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवली आहे. बॉक्स ऑफिस ट्रॅकींगनुसार या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 3.90 कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे. हा चित्रपट 265 सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट कमी स्क्रीन आणि शो असून सुद्धा हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक चित्रपटांच्या स्पर्धेत आकर्षक आकडेवारी गाठली आहे.

हे ही वाचा : सिनेमागृह गाजवल्यानंतर ‘हक’ OTT गाजवायला तयार; आता नेटफ्लिक्सवर पाहता येणार हा चित्रपट

सोशल मीडियावर पोस्ट

बॉलिवूडचे प्रसिद्ध ट्रेंड अनॅलिस्ट किंवा ट्रेंड विश्लेषक यांनी क्रांतीज्योती विद्यालय या मराठी चित्रपटाच्या कमाई संदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट शेअर केली आहे. मर्यादित स्क्रीन्स आणि शो असून सुद्धा हिंदी चित्रपटांच्या स्पर्धेत क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम ने सन्मानजनक कमाई केली आहे अशा आशयाची पोस्ट शेअर करण्यात आली असून यासह आकडेवारी देखील शेअर करण्यात आली आहे.

आठवड्यात एवढी कमाई

या चित्रपटाच्या आठवड्याभराच्या कमाई बद्दल बोलायचे झाले तर, गुरुवारी या चित्रपटाने 78 लाख रुपयांची कमाई केली. त्यानंतर शुक्रवारी 48 लाख, शनिवारी 1.10 कोटी आणि रविवारी 1.54 कोटी रुपयांची म्हणजेच एकूण 3.90 कोटी रुपयांची कमाई केल्याचे ट्रे विश्लेषक तरण आदर्श यांनी पोस्ट मध्ये म्हंटले आहे. शनिवार रविवार आल्यामुळे चित्रपटाच्या कमाईत वाढ झाल्याचे म्हंटले जात आहे. क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाने केलेली ही कमाई निर्मात्यांनाही दिलासादायक आणि आकर्षक ठरली असून हि कमाई कायम राहिल्यास आणखी वाढ होण्याची शक्यताहे.

मराठी मातीची ओढ या सर्वांमुळे अविस्मरणीय

क्रांतीज्योती विद्यालय या चित्रपटाने पहिल्याच दिवसांपासून प्रेक्षकांना भावुक केले आहे. या चित्रपटाच्या प्रभावी कथेची मांडणी, कलाकारांची अभिनयशैली आणि मनाला भिडणारे संवाद, संगीत आणि विशेष म्हणजे मराठी मातीची ओढ या सर्वांमुळे हा चित्रपट अविस्मरणीय अनुभव ठरत आहे. या चित्रपटाचे सोशल मीडियावर देखील प्रचंड कौतुक होत असून कलाकार आणि दिग्दर्शकांवर कमेंटच्या माध्यमातून आणि मेसेजेसच्या माध्यमातून कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

ही आहे स्टारकास्ट

क्रांतीज्योती विद्यालयमराठी माध्यम या चित्रपटात दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, निर्मिती सावंत, पुष्कराज चिरपुटकर, प्राजक्ता कोळी हे कलाकार आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले असून निर्माता म्हणून क्षिती जोग यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts