• Home
  • राजकारण
  • पुण्यात आणखी एक जमीन घोटाळा, राष्ट्रवादीच्या कार्यालयाबद्दल मोठा गौप्यस्फोट
Pune

पुण्यात आणखी एक जमीन घोटाळा, राष्ट्रवादीच्या कार्यालयाबद्दल मोठा गौप्यस्फोट

Pune land scam NCP office revelation

Pune land scam NCP office revelation : डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन ही 1936 साली स्थापन झालेली संस्था आहे. या संस्थेच्या अर्ध्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय उभे आहे. धर्मादाय आयुक्तांनी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन या संस्थेला त्यांची जागा भाड्याने देण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र संस्थेच्या विश्वस्तांनी ती जागा विकली, असा खळबळजनक आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांची शिवाजीनगरमध्ये ज्या इमारतीमध्ये पत्रकार परिषद झाली. त्या इमारतीसंदर्भात विजय कुंभार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अनेक गौप्यस्फोट केले.

हेही वाचा – घराणेशाहीचे राजकारण! एका कुटुंबातील अनेक उमेदवार निवडणूक रिंगणात

डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन या संस्थेची जागा विकसित करण्यासाठी संस्थेने साहिल प्रधान या व्यक्तीला पॉवर ऑफ अटर्नी दिली. हा साहिल प्रधान तोच आहे जो मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात अमेडिया कंपनी आणि शितल तेजवानी यांच्यात जो करार झाला. त्या व्यवहारांत साहिल प्रधान हा साक्षिदार आहे. यातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा या प्रकरणातील सहभाग दिसून येतोय, असा गौप्यस्फोटही विजय कुंभार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला. कल्पवृक्ष प्लांटेशन या कंपनीने ही जागा विकसित केलीय. तसेच कल्पवृक्ष प्लांटेशन कंपनीचे संचालक आणि सुनेत्रा पवार या इतरही कंपन्यांमध्ये एकत्रित संचालक आहेत, असंही विजय कुंभार यांनी सांगितले.

सदर जागा साठ वर्षांच्या भाड्याने देण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात या जाग विकसित करून विकण्यात आली. 2017 पासून या जमिनीची विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू होते, असं म्हणत भाजप देखील यामध्ये सहभागी आहेत. कारण ते कारवाई करत नाहीत. कारण ते सत्तेत एकत्रित आहेत, असा आरोप विजय कुंभार यांनी केला.

“सर्व शासकीय तरतुंदीचा भंग करून, महारेराची ऑर्डर असतानाही राष्ट्रवादीसाठी ही जागा विकली गेली आहे. धक्कादायक म्हणजे, भाजपादेखील यात सहभागी आहेत. ते सत्तेत असल्याने अजित पवारांवर कारवाई करत नाहीत. म्हणूनच आम्ही बोललो तर अजित पवार अडचणीत येतील, असे भाजपाकडून सातत्याने म्हटलं जातंय”, असंही विजय कुंभार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts