Riteish Deshmukh Ajit Pawar tribute : आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोक पसरला आहे. मुंबई येथून बारामतीत जात असताना विमान क्रॅश झाले मोठा स्फोट घडला. यात अजित दादा पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि राजकीय वर्तुळासाठी धक्काच होता. संपूर्ण महाराष्ट्रातून जनसमुदाय हळहळ व्यक्त करत आहे. याशिवाय आता मनोरंजन विश्वातुन अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
काय होती रितेश देशमुख यांची पोस्ट
Deeply shocked and terribly heartbroken to learn that we have lost Ajit Dada in a tragic accident. One of Maharashtra’s most dynamic leaders, he had zero tolerance for non-performance and constantly pushed and inspired those around him to excel. He never minced his words, his wit… pic.twitter.com/nGQ3M1xf0Z
— Riteish Deshmukh (@Riteishd) January 28, 2026
यावेळी विलासराव देशमुख यांचे सुपुत्र रितेश देशमुख यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यांनी या पोस्ट मध्ये म्हंटले की, अजित दादांच्या अपघाती निधनाची बातमी ऐकून मन हादरले. अत्यंत दुःख झाले. अजित दादा महाराष्ट्रातील सर्वाधिक गतिमान नेत्यांपैकी एक होते. कामात हलगर्जीपणाला माफी नव्हती. दादा आजूबाजूच्या प्रत्येकाला चांगले काम करण्यासाठी नेहमीच प्रेरित करत. त्यांचा स्पष्टवक्तेपणा, त्यांची बुद्धिमत्ता याला तोड नव्हती. त्यांच्या जाण्याने राज्यात मोठी हानी झाली आहे. कधीही भरून न निघणारी पोकळी त्यांच्या जाण्याने निर्माण झाली आहे. मला त्यांच्यासोबत अनेकदा संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यांनी दाखवलेली आपुलकी, सौजन्य कायम लक्षात ठेवेल. पवार कुटुंबियांना त्यांच्या आप्तस्वकीयांना आणि लाखो समर्थकांना माझ्या मनापासून संवेदना.
अभिनेता अजय देवगण यांनी वाहिली दादांना श्रद्धांजली
Shocked and saddened by the tragic passing of Hon. Deputy CM Ajit Pawar ji. My heartfelt condolences to his family, loved ones and all those affected by this immense loss.
Om Shanti 🙏🏻— Ajay Devgn (@ajaydevgn) January 28, 2026
माननीय उपमुख्यमंत्री अजित पवारजी यांच्या दुःखद निधनामुळे धक्का बसला. दुःख झाले. त्यांच्या कुटुंबियांना प्रियजनांना आणि मोठ्या नुकसानाने प्रभावित झालेल्या सर्वांप्रती माझी मनापासून संवेदना. अशा आशयाची पोस्ट अभिनेता अजय देवगण यांनी शेअर केली.
असा होता अजित दादांचा प्रवास
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी अहमदाबाद जिल्ह्यातील देवळाली प्रवरा याठिकाणी झाला. त्यांनी बी. कॉम पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर शेती व्यवसाय सांभाळत राजकारणात त्यांनी प्रवेश केला. त्यानंतर 1995 मध्ये त्यांनी बारामती मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकली. त्यांनी बारामती मतदारसंघाला आपला अजिंक्य किल्ला बनवले आणि प्रत्येक वेळी जनतेचा विश्वास मिळवला. त्यांनी या मतदारसंघातून सात वेळा निवडणूक जिंकली. या मतदारसंघाने त्यांना राज्यस्तरीय राजकारणात दृढ स्थान मिळवून दिले. आणि याच भागात त्यांचे विमान कोसळले. या घटनेने राजकीय वर्तुळातुन आणि मनोरंजन विश्वातून शोक व्यक्त केला जात आहे.












