Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • कलाविश्वात हळहळ; संकर्षण कऱ्हाडे आणि हेमांगी कवी यांनी अजित दादांबद्दल पोस्ट शेअर करत दिला भावनांना उजाळा
मनोरंजन

कलाविश्वात हळहळ; संकर्षण कऱ्हाडे आणि हेमांगी कवी यांनी अजित दादांबद्दल पोस्ट शेअर करत दिला भावनांना उजाळा

Ajit Pawar death tribute

Ajit Pawar death tribute : बुधवारी मुंबईहून बारामती जाणाऱ्या अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या जाण्याने महाराजस्त्र आज पोरका झाला. त्यांच्या जाण्याने राजकीय वर्तुळातच नाही देशभरात शोक पसरलाय. अशातचलाविश्वातून अजित दादांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अनेक अभिनेत्यांनी सोशल मीडियावर अजित दादांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. आज अजित दादा अनंतात विलीन झाले असून आज त्यांच्यावर अंतिमसंस्कार करण्यातले. अशातच मराठी अभिनेता, निवेदक संकर्षण कारंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहे.

कायहे संकर्षण कऱ्हाडे यांची पोस्ट

संकर्षण कऱ्हाडे यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्ट मध्ये त्यांनी अजित दादा पवार यांना श्रद्धांजली वाहत भावनांना वाट मोकळी करून दिली. या पोस्टमध्ये त्यांनी म्हंटलंय की, मा. अजीत पवार सरांचं जाणं फार दूर्दैवी … काही माणसं कोणत्या पक्षाची आहेत, कोणत्या पदावर आहेत ह्यापेक्षा ती महाराष्ट्राच्या राजकारणात दिसत राहिली कि , आधार वाटतो… त्यातले अजीतदादा पवार हे तसे आधार वाटायचे… आज घरातलं कुणीतरी आपल्यात नाही असं वाटतं आहे… खूप त्रास होतोय… !!! गंभिर प्रश्नांवर पण मिश्किल उत्तर देऊन पत्रकार परिषद गप्पांमध्ये बदलायची त्त्यांची शैली कमाल होती… त्यांच्या पंखाखाली असलेले अनेक कार्यकर्ते आज पोरके झाले हि भावना मी समजू शकतो …!!!  अपघातात त्यांच्यासह प्राण गमवलेल्यांनाही श्रद्धांजली अर्पण करतो…!!! अजीत दादा… खूप आठवण येत राहील…

हेमांगी कवी यांनी शेअर केला अनुभव

मराठी अभिनेत्री हेमांगी कवी यांनी देखील सोशल मीडियावर लेख पोस्ट करत अजित दादांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, काल सकाळी मी नेहमीप्रमाणे shooting ला गेले. Make up करून, तयार होऊन script वाचनाला आम्ही सगळे जमलो. Scene वाचायला सुरवात करणार तेवढ्यात आमच्या दिग्दर्शक जयंत पवारांच्या फोन वाजला. त्यांच्या आईंचा फोन होता. आमचे दिग्दर्शक म्हणाले “मी breakfast केला का विचारायला फोन केला असेल हां आता आईने” आणि हसत हसत आमच्यासमोरच call घेतला. ते हॅलो बोलणार इतक्यात ते म्हणाले “काय!!!?”आमच्या सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. तिथून त्यांनी काय ऐकलं आम्हांला काहीच कळेना. अगदी थोड्या वेळात त्यांनी फोन ठेवला आणि आम्हांला सांगितलं, “अजित पवार गेले”. आम्ही गोंधळून सगळ्यांनी एकदम विचारलं, “काय, कोण गेलं?”. तर ते हताशपणे म्हणाले “अजितदादा पवार”. हे ऐकल्यावर आम्हांला जो धक्का बसला तो मी इथं शब्दात सांगूच शकत नाही.

आम्ही पटापट आमचे आमचे फोन उघडून social media पाहू लागलो कारण आम्ही जे ऐकलं त्यावर आमचा विश्वासच बसत नव्हता. वाटत होतं काहीतरी चुकीचं ऐकलं किंवा काहीतरी नावाचा गोंधळ झाला असेल? Fake news असेल पण सगळ्या social media वर अजितदादांच्या मृत्यूच्या बातम्या दिसू लागल्या. धक्कादायक म्हणजे काय हे काल पुन्हा प्रकर्षाने जाणवलं. आणि ज्याप्रकारे मृत्यू झालाय ते तर आणखी भीषण आहे. आज हे सगळं लिहिताना सुद्धा मला नीट process झालेलं नाहीये.

अडनाव कवी आहे तर काय कविता बविता करता की नाही?

१० वर्षांपूर्वीची गोष्ट मी एका कार्यक्रमासाठी गेले होते. तिथे अजितदादांसोबत इतरही नेते सुद्धा आले होते. कार्यक्रम संपता संपता आम्हां कलाकारांना group photo साठी stage वर बोलवलं. कार्यक्रम शासकीय असल्यामुळे सगळे protocols सांभाळून photo काढले जात होते पण stage वर ही गर्दी झाली. GroupPhoto मध्ये सगळे नीट मावावेत म्हणून आम्ही सगळे कलाकार photo साठी line मध्ये पुढे उभे राहीलो, आमच्या मागे VIPs. तेवढ्यात मागून आवाज आला “काय कवी” मी आश्चर्याने मागे वळून पाहिलं तर माझ्या अगदी मागे दादा उभे होते. मी दचकून म्हणाले “Sir तुम्ही?” मला त्यांना विचारयचं होतं “तुम्हांला माझं नाव कसं माहीत?” हे विचारणार तेवढ्यात दादाच म्हणाले “अडनाव कवी आहे तर काय कविता बविता करता की नाही?” मी हसून नाही म्हटलं. “मी फक्त नावाची कवी आहे”. त्यावर त्यांनी विचारलं “आडनाव कवी कसं काय” मग मी थोडक्यात त्यांना सांगितलं.

…जयकुमार गोरेच्या गावच्या

बरं समोर photo काढणं सुरुच होतं. मग मागून कुणीतरी म्हटलं “तुम्ही पुण्याच्या का?” मी ‘नाही’ बोलणार इतक्यात दादाच म्हणाले… “अरे त्या ‘माण’ तालुक्याच्या आहेत…जयकुमार गोरेच्या गावच्या!” हे सगळं ऐकून मला आता फक्त चक्कर यायची बाकी होती. मी photo bito सोडून अजितदादांकडे बघत राहिले. तर ते त्यांची छानशी smile देत सगळ्यांसोबत photo काढत होते. Photo काढण्याचा कार्यक्रम झाला आणि ते आम्हां सगळ्यांना त्यांच्या विशेष style मध्ये left मनगटात काळ्या पट्ट्याचं घड्याळ घातलेल्या हातानं sharp असा नमस्कार करत ‘चला’ म्हणत तरतरतर निघून गेले.

उगाच नाही ते उपमुख्यमंत्रीएत!

घरी येऊन मी ही घटना माझ्या बाबांना सांगितली. मी म्हटलं एवढा मोठा, व्यस्त माणूस माझ्या सारख्या लहान कलाकाराचं नाव कसं लक्षात ठेवतो, Pappa? मी कुठली याचे details ही त्यांना कसे माहीत! त्यावर बाबा म्हणाले “चांगला नेता कायम तळागळ्यातल्या लोकांशी हा असा आपला connect ठेवतो. नावं, details लक्षात ठेवतो. त्यांच्या काकांसारखीच म्हणजे शरद पवारांसारखीच त्यांची memory sharp आहे. मोठ्या नेत्याचं हेच ते लक्षण. उगाच नाही ते उपमुख्यमंत्रीएत!” त्यानंतर अजितदादा मला अगदी ४-५ वेळाच भेटले पण प्रत्येक वेळी त्यांच्या मिश्किल smile ने “काय कवी” म्हणून हाक मारली. काल दिवसभर आणि आताही त्यांचं ते “काय कवी” माझ्या कानात घुमत आहे. सामान्य माणसाशी सहज connect असलेला नेता, माणूस, दादा गेला! Not done दादा, not done! “

शेती व्यवसाय सांभाळत राजकारणात प्रवेश

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी अहमदाबाद जिल्ह्यातील देवळाली प्रवरा याठिकाणी झाला. त्यांनी बी. कॉम पदवी शिक्ष पूर्ण केले. त्यानंतर शेती व्यवसाय सांभाळत राजकारणात त्यांनी प्रवेश केला. त्यानंतर 1995 मध्ये त्यांनी बारामती मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकली. त्यांनी बारामती मतदारसंघाला आपला अजिंक्य किल्ला बनवले आणि प्रत्येक वेळी जनतेचा विश्वास मिळवला. त्यांनी या मतदारसंघातून सात वेळा निवडणूक जिंकली. या मतदारसंघाने त्यांना राज्यस्तरीय राजकारणात दृढ स्थान मिळवून दिले. आणि याच भागात त्यांचे विमान कोसळले. या घटनेने राजकीय वर्तुळातुन आणि मनोरंजन विश्वातून शोक व्यक्त केला जात आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts