Shahheen Bhatt Engagement:बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टची (Alia Bhatt) बहीण शाहीन भट्ट हिने नुकताच केला असून ती लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. या साखरपुड्यानंतर तिचा होणार नवरा कोण आहे, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट ((Alia Bhatt) च्या घरात लवकरच आनंदाचे वातावरण पाहायला मिळणार आहे. तिची बहीण शाहीन भट्ट (Shahheen Bhatt) हिचा ईशान मेहरा (Ishaan Mehra) साखरपुडा नुकताच पार पडला असून, ती लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
हेही वाचा: चौथी-सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा ‘या’ तारखेला; कडक उन्हामुळे पालक-विद्यार्थी हैराण
शुक्रवारी शाहीन भट्टने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर (social media share photos) करत आपल्या साखरपुड्याची घोषणा केली. निसर्गरम्य ठिकाणी पार पडलेल्या या खास समारंभात तिने तिचा बॉयफ्रेंड ईशान मेहरा याच्यासोबत अंगठीची देवाणघेवाण केली.
खास क्षण सोशल मीडियावर शेअर
शहीनने शेअर केलेल्या फोटोंमध्ये दोघेही आनंदी मूडमध्ये दिसत असून, तिने आपल्या हातातील हिऱ्याची अंगठीही दाखवली आहे. या पोस्टला तिने “कदाचित आपण ही आवड थोडी पुढे नेली आहे” असे कॅप्शन दिले आहे.
सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव
साखरपुड्याची बातमी समोर येताच बॉलिवूड सेलिब्रिटींनी (Bollywood celebrity) दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. परिणीती चोप्रा, नेहा धूपिया, अर्जुन कपूर आणि अनन्या पांडे यांसारख्या कलाकारांनी कमेंट करत आनंद व्यक्त केला.
कोण आहेत शाहीन आणि ईशान?
शाहीन भट्ट ही लेखिका असून मानसिक आरोग्यावर आधारित लेखनासाठी ओळखली जाते. तिचा होणारा पती ईशान मेहरा हा फिटनेस कोच आहे. या साखरपुड्यानंतर आलिया भट्टच्या कुटुंबात लवकरच लग्नसोहळ्याची तयारी सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.




