Tom Cruise first Oscar – हॉलिवूडचा अभिनेता टॉम क्रूझ याला स्टार स्टडेड सोहळ्यात त्याच्या कारकिर्दीतील पहिला ऑस्कर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. रविवारी संध्याकाळच्या सुमारास या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले.
रविवारी संध्याकाळी लॉस एंजेलिसमध्ये डॉल्बी थिएटरमध्ये हा सोहळा पार पडला. त्यावेळी सर्वांनी उभे राहून टॉम क्रूझ वर टाळ्यांचा वर्षाव केला. लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये हा सोहळा पार पडला. यावेळी अमेरिकन हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रूझने पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावनिक भाषण केले. त्यावेळी त्यांनी चित्रपटाच्या जादू बद्दल सांगितले. टॉम क्रूज ने 63 व्य वर्षी चित्रपत ज्यांच्यामुळे यशस्वी झाला त्या सर्व लोकांचे अभिनंदन केले.
जगातील सर्वात मोठ्या सुपरस्टारपैकी एक आणि मिशन इम्पॉसिबल मालिका आणि टॉप गन फ्रॅंचाईझी यासारख्या लार्जर दॅन लाईफ चित्रपटांसाठी टॉम क्रूझला ओळखले जाते. त्याला आज देण्यात आलेला पुरस्कार चित्रपट निर्माता अलेजांद्रो जी. इनारिटू यांनी प्रदान केला.
A standing ovation for Tom Cruise as he receives his honorary Oscar at the #GovernorsAwards pic.twitter.com/TCXSGb05RA
— Deadline (@DEADLINE) November 17, 2025
दरवर्षी अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस यांच्या वतीने मानद ऑस्कर पुरस्कार प्रदान करण्यात येतो. हा चित्रपट क्षेत्रातील अप्रतिम आणि दीर्घकालीन योगदानाचा गौरव करणारा पुरस्कार आहे. यंदा हा पुरस्कार हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रूझ यांना प्रदान करण्यात आला आहे.
या समारंभावेळी आणखी काही दिग्गजांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री डेबी ऍलन, प्रोडक्शन डिझाइनर विन थॉमस आणि कंट्री म्युसिक आयकॉन डॉली पार्टन यांचा सहभाग आहे. (Tom Cruise first Oscar)












