Moshi Landfill Collapse: मोशीतील कचऱ्याचा डोंगर कोसळण्याच्या दुर्घटनेला ४३ तास उलटले तरी बचावकार्य सुरूच आहे. मात्र, या संथ बचाव मोहिमेवरून नातेवाईकांनी व्यवस्थेच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपो परिसरात झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर (Moshi Landfill Collapse) प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कचऱ्याचा मोठा ढिगारा ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळल्यानंतर ४३ तासानंतरही बचावकार्य सुरू आहे. मात्र, हे काम अपेक्षेप्रमाणे वेगाने होत नसल्याचा आरोप पीडितांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. Latest Marathi News
नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, कचरा डेपोच्या अगदी जवळ इमारत उभारण्यास परवानगी देताना सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करण्यात आले. इमारतीपासून कचऱ्याच्या ढिगाऱ्याचे अंतर कमी असतानाही बांधकामाला मंजुरी देण्यात आली. तसेच आवश्यक सुरक्षा उपाय, संरक्षक भिंत आणि भविष्यातील धोक्यांचा विचार करण्यात आला का, यावरही आता प्रश्न उपस्थित होत आहेत.
हेही वाचा: रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! १७ जुलैपर्यंत ‘या’ महत्त्वाच्या गाड्या धावणार नाहीत
नागरिकांकडून प्रशासना विरोध आरोप
वर्षानुवर्षे कचऱ्याचा ढिगारा वाढत असताना प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे ही केवळ नैसर्गिक घटना नसून व्यवस्थेतील त्रुटींमुळे घडलेली दुर्घटना आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. (Latest Pune Marathi News)
आयुक्तांच्या वक्तव्यावरून वाद
दुर्घटनेनंतर पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ही घटना नैसर्गिक असल्याचे सांगत कोणालाही थेट जबाबदार धरता येणार नसल्याचे मत व्यक्त केले. त्यांच्या या वक्तव्यावरून आता चर्चा सुरू झाली आहे. (Latest Pimpri Chinchwad News)
इमारत बांधकामातील त्रुटी, सुरक्षेच्या उपाययोजना, परवानग्या आणि संबंधित कंत्राटदाराची भूमिका याबाबत चौकशी होणार का, याबाबत नागरिकांकडून प्रश्न विचारले जात आहेत. मात्र, प्रशासनाकडून स्पष्ट उत्तर मिळत नसल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणात संबंधित कंत्राटदाराला कोणतीही जबाबदारी नसल्याचे संकेत इतक्या लवकर का देण्यात आले, यावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रशासनावर कोणताही दबाव आहे का, अशी चर्चाही सुरू आहे.
लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर नातेवाईकांचा आक्षेप
मोशी दुर्घटनेनंतर Moshi Landfill Collapse बचावकार्य सुरू असताना मंत्री आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी पुरेसे लक्ष दिले नसल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे.
पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाकडून परिस्थितीची माहिती घेत सूचना दिल्याचे सांगितले जात आहे. मदत व पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. काही स्थानिक आमदार आणि खासदारांनीही घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. LS Marathi News Channel
मात्र, दुर्घटनेच्या गंभीरतेच्या तुलनेत लोकप्रतिनिधींची उपस्थिती अपुरी असल्याची भावना पीडित कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. बचावकार्य सुरू असताना अधिक संवेदनशीलता आणि तत्परता दाखवण्याची गरज होती, अशी मागणी त्यांनी केली आहे.
चौकशीची मागणी वाढली
मोशी दुर्घटनेनंतर इमारत बांधकामाची परवानगी, कचरा व्यवस्थापनातील त्रुटी, सुरक्षेच्या उपाययोजना आणि प्रशासनाची जबाबदारी या सर्व बाबींची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. दोषी कोण आहे हे स्पष्ट होण्यासाठी स्वतंत्र आणि निष्पक्ष तपास होणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.












