मुंबई महानगरपालिका आरक्षण सोडत 11 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आले आहे. यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. मागील 20-20 वर्षापासून एकाच प्रभागाचे नेतृत्व करणार्यांनी आता देव पाण्यात ठेवले आहेत. आपल्या प्रभागावर आरक्षण सुटू नये आणि आपली राजकीय कारकीर्द खराब होऊ नये म्हणून सर्व इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. मुंबई पालिकेच्या 227 जागांसाठी ही सोडत काढली जाईल. आरक्षणाच्या निश्चितीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 31 जानेवारीपूर्वी या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे.
बीड पुन्हा चर्चेत! उपमुख्यमंत्र्याची बनावट सही, शिक्का वापरणारा सरपंच पोलिसांच्या ताब्यात
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची कार्यवाही 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने म्हटले आहे. त्याचप्रमाणे, एकूण 227 जागांपैकी, अनु जातीसाठी 15 जागा, अनु जमातीसाठी 2 जागा आणि इतर मागासवर्गीयांसाठी 61 जागा आरक्षित असणार आहेत. एकूण 227 जागांपैकी 50 टक्के म्हणजेच 114 जागा या महिलांसाठी आरक्षित असणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या कार्यक्रमानुसार, टप्पेनिहाय महापालिका निवडणूक होणार आहे.
सर्व इच्छुकांचे सोडतीकडे लक्ष
मुंबई महानगरपालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांची मुदत 7 मार्च 2022 रोजी संपल्यानंतर आतापर्यंत प्रशासक आयुक्तांच्या माध्यमातून पालिकेचा गाढा हाकला जात आहे. त्यामुळे निवडणुका कधी होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. असे असतानाच आता आरक्षण सोडतीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. या आरक्षणात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय तसेच महिलांसाठी राखीव असलेल्या प्रभागांमध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मागील टर्मला नगरसेवक असलेल्या ठिकाणचे आरक्षण कायम राहणार का?, पुरुषांसाठी असलेला वॉर्ड महिलांसाठी आरक्षित होतो का याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
अशी काढणार आरक्षणाची लॉटरी
आरक्षित जागांची संख्या निश्चित करून त्याला राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेण्यासाठी 30 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर रोजी प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. आरक्षण सोडतीची जाहिरात 6 नोव्हेंबर रोजी वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल.त्यानुसार आरक्षणाची सोडत 11 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर केली जाईल. सोडतीचा निकाल राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी 11 नोव्हेंबर रोजी सादर करण्यात येईल. 14 नोव्हेंबर रोजी आरक्षण, हरकती व सूचना मागविण्यासाचा विहित नमुना प्रसिद्ध करण्यात येईल. 20 नोव्हेंबर रोजी आरक्षण हरकती व सूचना मागविण्याची अंतिम तारीख असेल. अंतिम आरक्षण विहित नमुन्यात 28 नोव्हेंबर रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल.










