Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • मुंबईत गरबा खेळणाऱ्यांवर फेकली अंडी, मुंबईतील खेदजनक प्रकार पोलिसांच्या समोर उघड
Mumbai

मुंबईत गरबा खेळणाऱ्यांवर फेकली अंडी, मुंबईतील खेदजनक प्रकार पोलिसांच्या समोर उघड

मुंबईत गरबा कार्यक्रमा दरम्यान खेदजनक घटना घडली असून यामुळे मोठा राडा झाल्याचं समोर आलं आहे. मिरा रोड पूर्वेतील जे.पी. नॉर्थ गार्डनर सिटी या नामांकित सोसायटीत सार्वजनिक गरबा कार्यक्रमादरम्यान गरबा सुरु असतानाच एका व्यक्तीने गरबा करणाऱ्यांवर अंडी फेकली. या प्रकरणी एस्टेला बिल्डिंगच्या एका रहिवासी व्यक्तीच्या विरोधात काशिमिरा पोलिसांनी बी.एन.एस. 2023 कलम 300 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं काय घडलं?

काल (३० सप्टेंबर) रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास जे.पी.नॉर्थ गार्डनर सिटी सोसायटीत गरबा कार्यक्रम सुरू असताना, एस्टेला बिल्डिंगमधील एक रहिवासी व्यक्ती हातात मोबाईल घेऊन त्याठिकाणी आला. त्याने डेसिबल लेव्हल तपासले तसेच गरबा खेळणाऱ्या लोकांचे व्हिडिओ काढून ते पोलिसांना दाखवत होता. यापूर्वी देखील त्याने अनेक वेळा पोलिसांना फोन करून कार्यक्रम थांबवण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर, रात्री १०.५० वाजता एस्टेला बिल्डिंगच्या १६व्या मजल्यावरून त्या व्यक्तीने खाली काहीतरी फेकले, अशी माहिती एका नागरिकाने दिली. काही वेळातच दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या जवळ अंडे फुटलेल्या अवस्थेत आढळले. यामुळे रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली.

धार्मिक उपासना सुरू असताना जमावाला खेदजनक व्यत्यय आणल्याप्रकरणी गुन्हा नोंद

या कृत्यामागे तोच व्यक्ती असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला असून त्याच्या विरोधात शिवसेना शाखाप्रमुख महेश शिंदे तसेच विविध हिंदूवादी संघटना आक्रमक झाल्या आणि पोलिस ठाण्यात धाव घेतली. नागरिकांच्या दबावानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीच्या विरुद्ध धार्मिक उपासना सुरू असताना जमावास व्यत्यय आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. अद्याप त्या व्यक्तीला अटक करण्यात आली नसली, तरी पोलिसांनी त्याला नोटीस देऊन सकाळी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्याचे ठरवले आहे. दरम्यान, त्या व्यक्तीने यापूर्वीही बकरी ईदच्या निमित्ताने झालेल्या वादामुळे रहिवाशांशी सतत वाद घातले असल्याचे समोर आले आहे.

शिवसेना शाखाप्रमुख महेश शिंदेंची प्रतिक्रिया

याबाबत शिवसेना शाखाप्रमुख महेश शिंदे यांंनी म्हटलं की,”भाईंदर शहरामध्ये खूप निंदनीय प्रकार झाला आहे. मिरा रोड पूर्वेतील जे.पी. नॉर्थ गार्डनर सिटी या नामांकित सोसायटीत हा निंदनीय प्रकार झाला आहे. आज राज्यभर नवरात्र उत्सव साजरा होत आहे. त्याचबरोबर मीरा-भाईंदर शहरांमध्ये, मुंबई असू द्या सर्व ठिकाणी नवरात्रोत्सव साजरा होत आहे. प्रत्येक कॉम्प्लेक्समध्ये लोकं साजरा करत आहेत. पण आज मिरा रोड पूर्वेतील जे.पी. नॉर्थ गार्डनर सिटी या नामांकित सोसायटीत खाली गरबा सुरू असताना सोळाव्या मजल्यावरून समाजकंटकाने अंडी फेकली. ही गोष्ट मला काही लोकांनी फोनवरून सांगितली. इथल्या स्थानिकांनी मंत्री प्रताप सरनाईक यांना फोन केले. सरनाईक यांचा मला फोन आला. त्यांनी आम्हाला सांगितलं, तिथे जावा आणि पहा काय झालं आणि मला परिस्थिती सांगा काय आहे. आम्ही इथे पोहोचलो तेव्हा पाहिलं तर खाली अंड्याचे कवच पडले होते. समाजकंटकाने गरबा खेळत असताना विशेष म्हणजे, जिथे पोलीस होते, पोलीस बंदोबस्त असतानाही त्यांनी हा प्रकार केला आहे. त्यानंतर मी पोलिसांना, वरिष्ठांना फोन केला. जे काही घडलं आहे ते पोलिसांच्या समोर घडले आहे. त्यांच्यावरती कारवाई करा, जोपर्यंत कारवाई करणार नाही, तोपर्यंत आम्ही शिवसैनिक इथून हालणार नाही, असे आम्ही त्यांना सांगितलं. चार साडेचार वाजता त्या समाजकंटकावरती गुन्हा नोंद झाला आहे”, अशी माहिती महेश शिंदेंनी दिली.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts