महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईच्या रंगशारदा हॉलमध्ये आयोजित सभेत निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप करत “व्होटचोरी” आणि EVM मशीनमधील अनियमिततांचे थेट प्रात्यक्षिक दाखवले. “लाव रे तो व्हिडिओ” असा त्यांचा प्रसिद्ध डायलॉग पुन्हा ऐकू येताच उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला. या सभेमुळे महाराष्ट्रातील आगामी स्थानिक निवडणुकांबाबत पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला आहे.
राज ठाकरेंनी सभेत EVM मशीन कशी काम करते आणि मतदारांचे मत कोणत्या पक्षाला जात असते याचे प्रत्यक्ष डेमो दाखवले. त्यांनी म्हटले, “लोक आपल्याला मत देतात, पण इतरांच्या भानगड्यांमुळे आम्हाला पराभव पत्करावा लागतो. सत्तेत यायचं हे एकच ध्येय सत्ताधाऱ्यांचं आहे. मग हवी तशी सत्ता राबवायची हीच खरी राजकीय खेळी आहे.” या प्रात्यक्षिकात त्यांनी मतदार यादीतील घोटाळ्याचे नवीन उदाहरणे सादर केली.
हे ही वाचा – “आघाडी तुटली तरी चालेल, पण…”; शिवसेना नेत्याची खा. प्रणिती शिंदेंवर सडकून टीका
आयुक्तांच्या निवासस्थानावर १५० खोटे मतदार?
नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या निवासस्थानावर १५० खोटे मतदार असल्याचे मनसे कार्यकर्त्यांना आढळले आहे. ज्यात वयाची त्रुटी आणि मृत व्यक्तींची नावे समाविष्ट आहेत. मतदान प्रक्रियेत कसे बदल केले जाऊ शकतात आणि कोणत्या पक्षांना फायदा होतो गे ठाकरेंनी व्हिडिओद्वारे दाखवले. “९६ लाख बोगस मतदार घुसवले गेले आहेत, याद्या स्वच्छ होत नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊ देणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
नियमिततांचा थेट पुरावा दाखवला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत मतदार यादीतील मोठ्या प्रमाणातील अनियमिततांचा थेट पुरावा दाखवला. यापूर्वी १५ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मतदार यादीतील वयोमानातील अवास्तव त्रुटींची उदाहरणे सादर करत “व्होटचोरी”चे प्रात्यक्षिक केले. या घटनेमुळे महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सभेतील महत्त्वाचे मुद्दे –
– EVM हेराफेरीचे थेट प्रात्यक्षिक “लाव रे तो व्हिडिओ” म्हणत EVM मशीन कशी हॅक होते, मत कसे बदलले जाते याचे लाइव्ह डेमो.
– मतदार मत देतो एका पक्षाला, पण मत जाते दुसऱ्या पक्षाला” असा थेट आरोप.
– ९६ लाख बोगस मतदारांचा दावा मतदारयादीत मृत व्यक्ती, अवास्तव वय (१२४ वर्षे मुलगी, ४३ वर्षे वडील) यांची नवीन उदाहरणे.
– नवी मुंबई आयुक्त निवासस्थानावर १५० खोटे मतदार सापडल्याचा पुरावा.
– निवडणूक आयोगाला थेट आव्हान “याद्या स्वच्छ होईपर्यंत निवडणुका घेऊ देणार नाही.”
– “तुम्ही निवडणुका घेऊनच दाखवा!” असा इशारा.










