मुंबईहून सध्या मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील स्टुडिओमध्ये मुलांना ओलीस ठेवणाऱ्या आरोपी रोहित आर्यासोबत झालेल्या गोळीबाराच्या चकमकीत पोलिसांकडून त्याचा एन्काउंटर करण्यात आला आहे. प्रत्युत्तरात झालेल्या गोळीबारात मृत आरोपी रोहित आर्या गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. जिथं त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आले आहे.
मुंबईतील पवई परिसरात रोहित आर्या नावाच्या आरोपीने मुलांना ओलीस ठेवून परिसरात दहशत माजवल्याचे सांगण्यात आले. पोलिसांना आज पहाटे याची मिळाल्याचे सांगण्यात आले. आज दुपारच्या सुमारास मृत आरोपीने काही व्हिडिओ सोशल मिडियावर प्रसिद्द केले. ज्यामध्ये सांगण्यात आले आहे की, त्याला काही लोकांशी बोलायचं आहे. जर तसे झाले नाही तर तो सर्व काही जाळून टाकेल आणि स्वतःला आणि मुलांना इजा करेल असं म्हटलं होतं.
हे ही वाचा – आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ आणि पत्रकार सांगणारा ‘अलेक्झांडर पामर’ निघाला अकबर हुसैन, पाकिस्तानसोबत संबंध
मिळालेल्या माहितीनुसार, मृत रोहित आर्याने गेल्या सहा दिवसांत १७ मुलांना ओलीस ठेवले होते. मुंबई पोलिसांनी बाथरूममध्ये प्रवेश करून मुलांना वाचवले. मृत संशयिताला गोळी लागली आणि तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडून एक शस्त्र आणि एअर गन जप्त करण्यात आली आहे.
इतक्या मुलांचे अपहरण कसे झाले?
मुंबईतील पवईमध्ये उघड झालेल्या या धक्कादायक प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. आरोपी रोहित आर्यने ऑडिशनच्या बहाण्याने सुमारे १०० मुलांना त्याच्या स्टुडिओमध्ये बोलावले होते, जिथे त्याने १७ मुलांना निवडले आणि त्यांना ओलीस ठेवले होते. पोलिस तपासात असे दिसून आले आहे की, चित्रपट निर्माता असल्याचे भासवून आरोपीने मुलांना अभिनयाच्या संधी देण्याचे आमिष दाखवले. हळूहळू, त्याने त्यांना स्टुडिओच्या जमिनीवर आणि पहिल्या मजल्यावर कोंडून ठेवले.
१७ मुलांसह १९ जणांची सुटका
मुंबई पोलिसांनी पवई परिसरातून आरोपी मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यला गोळीबारात ठार केलं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तो गेल्या सहा दिवसांपासून १७ मुलांना बंदिस्त बनवत होता. पोलिसांनी सर्व १९ मुलांची सुटका केली. आरोपीकडून एक एअर गन देखील जप्त करण्यात आली आहे. रोहित मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे वृत्त आहे आणि तो सतत व्हिडिओ प्रसिद्ध करत आहे. पोलिसांनी सर्व मुलांना सुरक्षितपणे सोडवले आहे आणि आता घटनेमागील हेतू आणि संभाव्य नेटवर्क शोधण्यासाठी आरोपीची चौकशी करत आहे.












