मुंबई येथील ठाणे शहरात असलेल्या विव्हियाना मॉलचे नाव बदलल्याने सर्वत्र चर्चा होत आहे. यामागे नेमकं काय कारण आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
मुंबई ठाणे शहराच्या मध्यभागी असलेल्या विव्हियाना मॉलचे नाव बदलण्यात आले आहे. हा मॉल लेक शोर इंडिया ॲडव्हायझरी ने हा मोल खरेदी केल्याची माहिती उघड झाली आहे. हा आतापर्यंतचा भारतातील कोणत्याही रिटेल मालमत्तेसाठी झालेला सर्वात मोठा करार आहे. या करारामुळे ठाण्याचे एक मोठे व्यावसायिक केंद्र म्हणून ओळख निर्माण झाली आहे. याबाबत सूत्राच्या माध्यमातून माहिती मिळाली आहे.
अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटीच्या (ADIA) पाठिंब्यामुळे झालेला हा व्यवहार बहुतेक 1900 कोटी रुपयांचा असून, हा करार पूर्ण झाल्यानंतर, ‘विव्हियाना मॉल’ आता ‘लेक शोर’ या नावाने ओळखला जाईल. करण्यात आलेल्या बदलामुळे मुंबई महानगर प्रदेशातील एक महत्त्वाचे शॉपिंग आणि लाईफस्टाईल डेस्टिनेशन म्हणून या मॉलच्या प्रवासाचे एक नवीन पर्व सुरू झाले आहे. या विव्हियाना मॉलची मालकी यापूर्वी सिंगापूरच्या ‘जीआयसी’ आणि ‘अश्विन शेठ ग्रुप’कडे होती.
हा 1,900 कोटी रुपयांचा करार ऐतिहासिक असून भारतीय रिअल इस्टेट आणि रिटेल क्षेत्रासाठी एक महत्वपूर्ण करार आहे. मुंबई येथील ठाणे शहर वेगाने वाढत असून एक कॉर्पोरेट, निवासी आणि रिटेल केंद्र म्हणून विकसित होत आहे. तसेच उत्तम कनेक्टिव्हिटी, प्रीमियम हाऊसिंग प्रोजेक्ट्स आणि वाढती शहरी लोकसंख्या यामुळे आता ठाणे शहर ‘लेक शोर’सारख्या मोठ्या रिटेल मार्केटमध्ये एका मजबूत ग्राहक आधाराची निर्मिती करत आहे.
कुठे आहे विव्हियाना मॉल
विव्हियाना मॉल हा ठाणे पश्चिम येथील इस्टर्न एक्सप्रेस हायवे वर आहे. हा मॉल 13 एकर जमिनीवर बांधण्यात आले असून सुमारे 17 लाख चौरस फूट क्षेत्रफळात पसरले आहे. या मॉलमध्ये सुमारे 10 लाख चौरस फूट क्षेत्रफळ खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा भारतातील पहिला आणि एकमेव दृष्टिबाधित-अनुकूल मॉल आहे. या व्यक्तींसाठी ‘एक्सआरसीव्हीसी-विवियाना एक्स्टेंशन’ नावाचे एक संसाधन केंद्र देखील आहे. हा मॉल सौर ऊर्जा वापरतो आणि येथे सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित करण्यात आला आहे.








