Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • नेरूळमध्ये दोन विद्यार्थिनींना विजेचा धक्का; डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार, महापौरांची भेट
गुन्हा

नेरूळमध्ये दोन विद्यार्थिनींना विजेचा धक्का; डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार, महापौरांची भेट

Electric shock

Nerul Electric Shock: नवी मुंबईतील नेरूळ परिसरात दोन विद्यार्थिनींना विजेचा धक्का लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नेरूळ एलपी परिसरात विद्युत वाहिनीमध्ये अचानक बिघाड झाल्याने दोन्ही विद्यार्थिनी विजेच्या संपर्कात आल्या. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, विद्युत वाहिनी अचानक तुटल्याने किंवा खाली आल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. जखमी विद्यार्थिनींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत. डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

हेही वाचा: “फोडाफोडीचं राजकारण देशासाठी घातक”; राज ठाकरेंचा केंद्र आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल

या घटनेबाबत महावितरणच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचा आरोप करण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांनीही परिसरातील विद्युत यंत्रणेच्या देखभालीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणाची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर सुजाता पाटील यांनी डी. वाय. पाटील रुग्णालयात जाऊन जखमी विद्यार्थिनींची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी डॉक्टरांकडून उपचारांची माहिती घेतली.

घटनेनंतर भविष्यात अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आणि विद्युत यंत्रणेची नियमित तपासणी करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याची माहिती महापौरांनी दिली. तसेच जखमी विद्यार्थिनींना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळतील, याची खात्री करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts