Uorfi Javed: हटके फॅशनमुळे कायम चर्चेत असणारी उर्फी जावेद सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिने धर्मांतर केल्याचा आणि नाव बदलल्याचा दावा केला जात असून, यामुळे मोठी चर्चा रंगली आहे.
सोशल मीडियावर पुन्हा एकदा उर्फी जावेद (Uorfi Javed) चर्चेत आली आहे. यावेळी तिच्या फॅशनमुळे नव्हे, तर तिच्या धर्मांतराबाबत करण्यात आलेल्या दाव्यांमुळे वाद निर्माण झाला. एका सोशल मीडिया कंटेंट क्रिएटरने उर्फीने धर्म बदललं असून तिने स्वतःचे नाव रीता भारद्वाज’ ठेवले असल्याचा दावा करणारा व्हिडिओ शेअर केला. हा दावा व्हायरल होताच उर्फीने त्यावर स्पष्ट प्रतिक्रिया दिली.
उर्फी जावेदने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर संबंधित व्यक्तीसोबत झालेल्या संवादाचे स्क्रिनशॉर्ट शेअर करत हे सर्व दावे पूर्णपणे खोटे असल्याचे म्हटले. तिने स्पष्ट केले की, तिने कोणतेही धर्मांतर केलेलं नाही आणि तिचे नावही बदललेले नाही.
या पोस्टमध्ये उर्फीने (Uorfi Javed) संबंधित कंटेंट क्रिएटरवर टीका करत, कोणतीही माहिती प्रसारित करण्यापूर्वी तिची सत्यता तपासण्याचा सल्ला दिला. चुकीची माहिती पसरवून लोकांची दिशाभूल करू नये, असेही ती म्हणाली


उर्फीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, कोणत्याही व्यक्तीवर टीका करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. मात्र, त्यासाठी खोट्या बातम्या किंवा आधारहीन दावे करणे योग्य नाही. तिने स्वतःबद्दलच्या अफवा पसरवण्यापेक्षा वस्तुस्थिती जाणून घेण्याचे आवाहन केले.
याशिवाय, तिने संबंधित व्यक्तीला इंटरनेटवर उपलब्ध असलेली माहिती तपासण्याचा सल्ला देत, स्वतःच्या कामाविषयी आणि सार्वजनिक प्रतिमेबाबत चुकीची माहिती पसरवू नये, असे सांगितले.
उर्फी जावेद (Uorfi Javed) सोशल मीडियावर तिच्या वेगळ्या फॅशन स्टाइलमुळे कायम चर्चेत असते. अनेकदा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. मात्र, यावेळी धर्मांतर आणि नाव बदलल्याच्या दाव्यांवर तिने थेट प्रतिक्रिया देत अफवांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.











