Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • ऑनलाइन शॉपिंगमध्ये पैसे वाचवायचे आहेत? खरेदी करण्यापूर्वी ‘या’ 3 गोष्टी नक्की करा!
लाईफस्टाईल

ऑनलाइन शॉपिंगमध्ये पैसे वाचवायचे आहेत? खरेदी करण्यापूर्वी ‘या’ 3 गोष्टी नक्की करा!

Online Shopping Tips

Online Shopping Tips: तुम्हीही सतत ऑनलाइन शॉपिंग करत असाल, तर कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी नक्की करा.

ऑनलाईन शॉपिंग (Online Shopping Tips) आता अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनली आहे. विविध ई- कॉमर्स वेबसाइट्सवर वर्षभर सेल, कूपन आणि कॅशबॅक ऑफर्स सुरू असतात. मात्र, प्रत्येक सवलत ही खरोखर फायदेशीर असतेच असे नाही. थोडी माहिती आणि योग्य नियोजन केल्यास तुम्ही अनावश्यक खर्च टाळू शकता आणि त्याच उत्पादनावर अधिकब बचतही करू शकता.

हेही वाचा: पावसात ऑफिस- कॉलेजला जाताय? ‘या’ गोष्टींची काळजी घेतलीच पाहिजे!

एकाच प्लॅटफॉर्मवर अवलंबून राहू नका

एखादे उत्पादन खरेदी करण्यापूर्वी त्याची किंमत वेगवेगळ्या ई-कॉमर्स वेबसाइटवर तुलना करा. एखाद्या प्लॅटफॉर्मवर किंमत जास्त असू शकते, तर दुसऱ्या ठिकाणी तेच उत्पादन कमी दरात उपलब्ध असू शकते. तसेच, संबंधित ब्रँडच्या अधिकृत वेबसाइटवरही किंमत तपासल्यास आणखी चांगली ऑफर मिळण्याची शक्यता असते. Latest LS Marathi News

उत्पादनाची प्राइस हिस्ट्री तपासा

सेलमध्ये अनेक उत्पादनांवर मोठ्या सवलतीचे दावे केले जातात. मात्र, त्या उत्पादनाची मागील काही महिन्यांतील किंमत किती, हे तपासणे गरजेचे आहे. प्राइस हिस्ट्री पाहिल्यास सध्याची ऑफर खरोखरच फायदेशीर आहे की नाही, याची कल्पना येते. यासाठी विविध ब्राउझर एक्स्टेन्शन किंवा थर्ड-पार्टी टूल्सचा वापर करता येतो. LS marathi News Channel

प्राइस ड्रॉप अलर्टचा वापर करा

तुम्हाला एखादे उत्पादन खरेदी करायचे असल्यास थोडा संयम ठेवा. अनेकदा उत्पादनांच्या किमती सतत बदलत असतात. अशावेळी प्राइस ड्रॉप अलर्ट सेट केल्यास उत्पादनाची किंमत कमी होताच तुम्हाला सूचना मिळते. त्यामुळे योग्य वेळी खरेदी करून अधिक बचत करता येते.

ऑनलाइन शॉपिंग करताना ‘या’ गोष्टीही लक्षात ठेवा (Online Shopping Tips)

ऑफर आणि डिस्काउंटची माहिती नीट वाचा.
ग्राहकांचे रिव्ह्यू आणि रेटिंग तपासा.
विक्रेत्याची विश्वासार्हता पडताळा.
रिटर्न आणि वॉरंटी पॉलिसी समजून घ्या.
पेमेंट करण्यापूर्वी अंतिम किंमत आणि डिलिव्हरी शुल्क तपासा.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts