Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये? आज ‘मातोश्री’वर आमदारांची महत्त्वाची बैठक; नेमकं असणार निर्णय
राजकारण

उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये? आज ‘मातोश्री’वर आमदारांची महत्त्वाची बैठक; नेमकं असणार निर्णय

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray: शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षातील अलीकडील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज ‘मातोश्री’ येथे पक्षाच्या आमदारांची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. पक्षातील बदलत्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि पुढील रणनीती निश्चित करण्यासाठी ही बैठक महत्वाची मानली जात आहे.

खासदारांच्या पक्षांतरानंतर हालचालींना वेग

अलीकडेच पक्षातील सहा खासदारांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. त्याआधी या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे स्वत्रंत गटासंदर्भात पत्र दिल्याची चर्चा होती. या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या घडामोडींनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संबंधित मतदारसंघांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि पक्षाची भूमिका मंडळण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा: पुण्यातील 101 महापालिका शाळांना अचानक सुट्टी; कारण जाणून तुम्हालाही वाटेल अभिमान

आज ‘मातोश्री’वर आमदारांची बैठक

पक्षातील ताज्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी 7 वाजता ‘मातोश्री’ येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीत पक्ष संघटना, आगामी राजकीय रणनीती आणि सध्याच्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.

पक्षातील चर्चांना उधाण

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील काही आमदारांच्या राजकीय भूमिकेबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू आहेत. मात्र, याबाबत पक्षाकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे आजच्या बैठकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आमदारांशी थेट संवाद साधून पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बैठकीकडे राजकीयवर्तुळाचे लक्ष

पक्षातील अलीकडील घडामोडींनंतर आज होणाऱ्या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या बैठकीत कोणते निर्णय घेतले जातात, उद्धव ठाकरे आमदारांना कोणता संदेश देतात आणि पुढील राजकीय दिशा काय असेल, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts