Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • साखरपुड्यापूर्वीच सिया-चेतनच्या नात्यात काय घडलं? व्हॉट्सॲप चॅटमधून नवी माहिती समोर
गुन्हा

साखरपुड्यापूर्वीच सिया-चेतनच्या नात्यात काय घडलं? व्हॉट्सॲप चॅटमधून नवी माहिती समोर

Ketan Agrawal Murder Case

Ketan Agrawal Murder Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा वळणं आला आहे. सिया आणि चेतन हे साखरपुड्यापूर्वीपासूनच एकमेकांच्या संपर्कात असल्याची माहिती तपासातून समोर येत आहे. दोघांच्या व्हॉट्सॲप चॅटमधून पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागल्याचे सांगितले जात आहे.

लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात (Ketan Agrawal Murder Case)  तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे नवे धक्कदायक पैलू समोर येत आहेत. आता पोलिसांच्या तपासात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या नात्याबाबत महत्वाची माहिती समोर आल्याचा दावा केला जात आहे. दोघांच्या व्हॉट्सॲप संभाषणातून त्यांच्या लग्नाबाबत काही संकेत मिळाल्याचे पोलीस तपासात समोर आल्याची माहिती आहे.

हेही वाचा: पुण्यातील 101 महापालिका शाळांना अचानक सुट्टी; कारण जाणून तुम्हालाही वाटेल अभिमान

केतन अग्रवाल याची १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावरून आली ढकलून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात केतांची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना पोलिसांनी अटक केली असून, दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

मोबाईल तपासातून मिळाले महत्वाचे धागेदोरे (Ketan Agrawal Murder Case)

तपासादरम्यान पोलिसांनी सिया गोयलाच दुसरा मोबाईल ताब्यात घेतला होता. या मोबाईलमधील व्हॉट्सॲप चॅट, कॉल डिटेल्स, लोकेशन आणि इंटरनेटवरील शोध इतिहासाची तपासणी करण्यात आली आहे.

डिजिटल पुराव्यांच्या आधारे पोलिसांना या प्रकरणाशी संबंधित काही महत्त्वाचे पुरावे मिळाल्याची माहिती समोर येत आहे. याच तपासातून सिया आणि चेतन यांच्या संबंधांबाबत नवी माहिती समोर आली आहे.

गुपचूप उरकलं लग्न (Siya And Chetan Marriage)

पोलिसांच्या तपासानुसार, सिया आणि चेतन यांनी काही महिन्यांपूर्वीच लग्न केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबतचा अंतिम निष्कर्ष तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

विशेष म्हणजे 19 फेब्रुवारी रोजी सिया आणि केतन यांचा साखरपुडा झाला होता. त्याच कालावधीच्या आसपास सिया आणि चेतन यांच्या नात्यातील घडामोडी वाढल्याचा तपास यंत्रणांचा संशय आहे. हे लग्न कुटुंबीयांपासून लपवण्यात आले होते का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.

राजस्थानमध्ये स्थायिक होण्याचा विचार? ( Rajasthan)

तपासात सिया आणि चेतन यांच्या राजस्थान दौऱ्याची माहितीही समोर आली आहे. दोघे उदयपूर आणि जोधपूर येथे फिरायला गेले होते. त्यावेळी त्यांनी राजस्थानमध्ये स्थायिक होण्याबाबत चर्चा केल्याचे समोर येत आहे.

चेतन सियाला राजस्थानची संस्कृती, पारंपरिक वेशभूषा आणि तेथील जीवनशैलीबाबत माहिती देत असल्याची माहिती आहे. लग्नानंतर पुणे सोडून राजस्थानमध्ये राहण्याचा दोघांचा विचार होता, असा पोलिसांचा अंदाज आहे.

फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा

सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर आणखी काही महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून डिजिटल पुरावे, घटनाक्रम आणि आरोपींच्या जबाबांचा तपास केला जात आहे.

केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचा विवाह होणार होता. मात्र त्यापूर्वीच केतनची हत्या झाल्याने या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे. या हत्येचा संपूर्ण उलगडा तपास पूर्ण झाल्यानंतरच होणार आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts