Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • भर पावसात लोहगडावर चेतनला घेऊन सीन रिक्रिएशन; केतन अग्रवाल प्रकरणात नवे मोठे खुलासे
Pune

भर पावसात लोहगडावर चेतनला घेऊन सीन रिक्रिएशन; केतन अग्रवाल प्रकरणात नवे मोठे खुलासे

Ketan Agarwal Death Case

Ketan Agarwal Death Case: आज सकाळी भर पावसात केतन अग्रवाल प्रकरणात पुढील तपासासाठी लोहगडावर चेतनला घेऊन सीन रिक्रिएशन केला जात आहे. यावेळी अनेक मोठे खुलासे झाल्याची माहिती समोर आली आहे.

केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाच्या (Ketan Agarwal Death Case) तपासात मोठी प्रगती झाली असून, मुख्य आरोपी चेतन चौधरी याला पुणे ग्रामीण पोलिसांनी लोहगड किल्ल्यावर नेऊन घटनास्थळी सीन रिक्रिएशन केले. कडाक्याच्या पावसात आणि कडेकोट पोलीस बंदोबस्तात ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली.

पोलिसांनी आरोपी चेतनला त्या ठिकाणी नेले, जिथून केतन अग्रवाल खाली दरीत पडल्याचा दावा करण्यात येत आहे. घटनास्थळी पंचनामा करून संपूर्ण गटनाक्रमाची पुनर्रचना करण्यात आली. आरोपीने घटनादरम्यान कोणती हालचाल केली आणि नेमकी परिस्थिती काय होती, याचा तापस पथकाने नोंदवला.

हेही वाचा: जुलै 2026 मध्ये आहेत हे महत्त्वाचे सण आणि व्रत; जाणून घ्या संपूर्ण महिन्याचे कॅलेंडर

या सीन रिक्रिएशनचा उद्देश घटनास्थळी घडलेल्या गोष्टीची पडताळणी करणे आणि आरोपीच्या जबाबाची सत्यता तपासणे हा आहे. मिळालेली माहिती भविष्यातील तापासासाठी महत्वाची ठरणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

गेट अॅनालिसिसची तयारी

सीन रिक्रिएशननंतर चेतन चौधरींची गेट अॅनालिसिस प्रक्रिया देखील केली जाणार आहे. या तांत्रिक तपासात आरोपीच्या चालण्याची पद्धत, शरीराची हालचाल आणि उपलब्ध व्हिडीओ किंवा इतर पुराव्यांशी त्याची तुलना केली जाईल. यामुळे घटनास्थळी दिसणारी व्यक्ती आणि आरोपी यांच्यातील साम्य स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.

केतन अग्रवालचा मृतदेह

केतन अग्रवालचा मृतदेह (Ketan Agarwal Death Case) लोहगड किल्ल्यावर संशयास्पद परिस्थितीत आढळला होता. सुरुवातीला हा अपघात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र तपासात समोर आलेल्या तांत्रिक पुराव्यांमुळे आणि साक्षीदारांच्या जबाबांमुळे प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.

यानंतर पोलिसांनी चेतन चौधरीला अटक करून सखोल तपास सुरू केला आहे. केतनला जाणूनबुजून दरीत ढकलण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात असून, त्यासाठी विविध वैज्ञानिक आणि तांत्रिक पुरावे गोळा केले जात आहेत.

नेमकं प्रकरण काय आहे?

पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर १८ जून रोजी ट्रेकिंगदरम्यान केतन अग्रवालचा मृत्यू सुरुवातीला अपघात मानला जात होता. मात्र तपासात समोर आलेल्या माहितीनंतर या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले असून होणारी बायको सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन याने प्लॅन करून ४०० फूट दरीत ढकलून दिल्याची माहिती समोर आली. यानंतर चेतन आणि सियाला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले असून पुढील तपास सुरु आहेत.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts