Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • पिंपरी चिंचवड महापालिकेची प्रारूप मतदार यादी १४ नोव्हेंबरला होणार प्रसिद्ध
Pune

पिंपरी चिंचवड महापालिकेची प्रारूप मतदार यादी १४ नोव्हेंबरला होणार प्रसिद्ध

website 17

पिंपरी : राज्य निवडणूक आयोगाने आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांच्या स्वाक्षरीने याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेसह राज्यातील २९ महापालिकांची प्रारूप मतदार यादी १४ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आदेशानुसार, प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम दिनांक २२ नोव्हेंबर २०२५ असणार आहे. प्राप्त हरकती व सूचनांवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करून ६ डिसेंबर २०२५ प्रसिद्ध करण्यात येईल. तर मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी ८ डिसेंबर २०२५ प्रसिद्ध करण्यात येणार असून मतदान केंद्रनिहाय मतदार यादी १२ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts