Breaking News :
  • Home
  • शहर
  • कर्जवसुलीसाठी शेतकऱ्याला शिवीगाळ; महिला रिकव्हरी एजंटची ऑडिओ क्लिप व्हायरल
राजकारण

कर्जवसुलीसाठी शेतकऱ्याला शिवीगाळ; महिला रिकव्हरी एजंटची ऑडिओ क्लिप व्हायरल

Farmer Harassment Allegation in Latur
6
  • लातूरमध्ये कर्जवसुलीसाठी आलेल्या फायनान्स कंपनीच्या महिला रिकव्हरी एजंटने शेतकऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप समोर आला आहे.
  • संबंधित संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकारावर संताप व्यक्त केला जात आहे.
  • शेतकऱ्यासह शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यालाही शिवीगाळ केल्याचा आरोप असून शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
Loan Recovery Case : लातूरमध्ये कर्जवसुलीच्या नावाखाली शेतकऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. महिला रिकव्हरी एजंटची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत असताना कर्जवसुलीच्या नावाखाली फायनान्स कंपन्यांकडून होणाऱ्या कथित त्रासाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. लातूर जिल्ह्यातील एका मायक्रो फायनान्स कंपनीच्या महिला रिकव्हरी एजंटने शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्याशी फोनवरून अर्वाच्च भाषेत संवाद साधल्याचा प्रकार समोर आला आहे. या संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. (Loan Recovery)

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शेतकऱ्याच्या कर्जाचा हप्ता थकल्यानंतर वसुलीसाठी महिला रिकव्हरी एजंटने फोन केला होता. मात्र, या संभाषणादरम्यान शेतकऱ्याच्या कुटुंबी यांचा उल्लेख करत कथितरीत्या अपमानास्पद आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्याने या प्रकरणात हस्तक्षेप केला असता त्यांच्याशीही उद्धटपणे बोलण्यात आल्याचे सांगितले जात आहे.(Farmer Life)

सरकारच्या सूचनांनंतरही वसुलीचा तगादा?

राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांवर कर्जवसुलीसाठी सक्ती किंवा मानसिक दबाव आणू नये, अशा सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून होणाऱ्या सक्तीच्या वसुलीचा प्रश्न उपस्थित करत आरबीआयशी चर्चा केल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतरही काही कंपन्यांच्या वसुली पद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. (Female Recovery Agent Viral Audio)

यापूर्वीही राज्यातील विविध भागांतून कर्जवसुलीच्या पद्धतीबाबत तक्रारी समोर आल्या आहेत. लातूरमध्येच कर्जवसुलीच्या वादातून शेतमजुराचे घर सील केल्याचे प्रकरण चर्चेत आले होते. तसेच नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांतही वसुलीच्या पद्धतीवरून शेतकरी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली होती. (Loan Recovery Case)

शेतकरी संघटना आक्रमक; कठोर कारवाईची मागणी

लातूरमधील या कथित प्रकारामुळे शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या संघटनांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. माध्यमांसमोर आलेली प्रकरणे ही केवळ काही उदाहरणे आहेत की अशा प्रकारच्या आणखीही तक्रारी आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Recovery Agent Misbehavior)

संबंधित महिला रिकव्हरी एजंटसह फायनान्स कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करावी, व्हायरल ऑडिओ क्लिपची सत्यता तपासावी आणि शेतकऱ्यांशी गैरवर्तन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. कर्जाची वसुली करताना शेतकऱ्यांचा सन्मान आणि त्यांच्या कुटुंबीयांची प्रतिष्ठा जपली जाणार का? सरकारच्या सूचनांचे पालन न करणाऱ्या फायनान्स कंपन्यांवर प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे आता लक्ष लागले आहे. (Farmer Harassment Case)

हेही वाचा : Sugarcane Farmers Protest : ऊसदरासाठी राजू शेट्टींचा एल्गार! १६ नोव्हेंबरला सोलापुरात शेतकऱ्यांचा धडक मोर्चा; कारखानदारांना दिला अल्टिमेटम

img

Shivani Nagarale

Content Writer

Shivani Nagarale | Digital Journalist | News Writer | Digital Content CreatorHello! I am Shivani Nagarale, a digital journalist with two years of experience in journalism and digital media. Since beginning my professional journey in 2023, I have gained experience in various aspects of media, including digital content creation, news writing, information research, and content development for digital platforms.Alongside journalism, I have developed an understanding of digital media and digital marketing, gaining insights into content performance, audience engagement, and effective ways of reaching readers across digital platforms.Currently, I am working as a Digital Journalist at Loksevay, under LS Marathi, where I contribute to digital news production, covering current affairs, diverse news topics, informative articles, and reader-focused content. My approach to journalism emphasizes thorough research, factual accuracy, objective reporting, and clear, engaging writing.I believe in continuously adapting to the evolving landscape of digital journalism, exploring emerging media trends, and strengthening my editorial skills. My professional goal is to create credible, informative, and engaging content that bridges the values of responsible journalism with the growing reach of digital media.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts