Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • Top News
  • अचानक FDA पोहोचलं अन् उघड झाला प्रकार! पुण्यातील ‘या’ प्रसिद्ध कॅफेचे लायसन्स सस्पेंड
Pune

अचानक FDA पोहोचलं अन् उघड झाला प्रकार! पुण्यातील ‘या’ प्रसिद्ध कॅफेचे लायसन्स सस्पेंड

Pune Irani Cafe License Suspended

Pune Irani Cafe License Suspended: महाराष्ट्रात FDA कडून विविध ठिकाणी तपासणी आणि कारवाई सुरू आहे. त्यातच पुण्यातील एका प्रसिद्ध कॅफेवर अचानक छापा टाकण्यात आला. तपासणीदरम्यान किचनमधील काही गंभीर बाबी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्या. यानंतर FDA ने तातडीने कारवाई करत कॅफेचे कामकाज बंद करण्याचे आदेश दिले असून, संबंधित आस्थापनेचे लायसन्स निलंबित करण्यात आले आहे.

चहा आणि खाद्यपदार्थांचे शौकीन असलेल्या पुणेकरांसाठी (Pune Irani Cafe License Suspended) एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरातील एका प्रसिद्ध इराणी कॅफेवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाई करत परवाना निलंबित केला आहे. तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेशी संबंधित काही गंभीर त्रुटी आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा: २०३५ पर्यंत भारताचे स्वतःचे स्पेस स्टेशन! अंतराळात ते नेमके कसे उभारले जाणार? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली माहिती जाणून घ्या

राज्यात सध्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ या मोहिमेअंतर्गत खाद्य आस्थापनांची तपासणी केली जात आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून FDA च्या पथकाने कोंढवा-येवलेवाडी रस्त्यावरील संबंधित इराणी टी कॅफेची (Irani Tea Cafe) अचानक तपासणी केली.

तपासणीदरम्यान कॅफेच्या स्वयंपाकघरात आणि खाद्यपदार्थांच्या साठवणुकीच्या ठिकाणी अन्न सुरक्षा नियमांशी संबंधित त्रुटी आढळल्या. तसेच काही मुदतबाह्य खाद्यपदार्थांचा साठा आढळून आल्याने प्रशासनाने तातडीने कारवाई केली.

अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित कॅफेचा परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला आहे. FDA ने खाद्य व्यावसायिकांना ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न देण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, याच विशेष मोहिमेअंतर्गत पुण्यातील पानशेत रस्त्यावरील एका रेस्टॉरंटवरही FDA कडून कारवाई करण्यात आली आहे. शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि कॅफेची तपासणी पुढेही सुरू राहणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या कारवाईमुळे खाद्य आस्थापनांमधील स्वच्छता, अन्न साठवणूक आणि सुरक्षा नियमांचे पालन किती महत्त्वाचे आहे, याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts