Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुढील 24 तास महत्त्वाचे! महाराष्ट्रातील ‘या’ भागांत जोरदार पावसाचा पडण्याची शक्यता
महाराष्ट्र

पुढील 24 तास महत्त्वाचे! महाराष्ट्रातील ‘या’ भागांत जोरदार पावसाचा पडण्याची शक्यता

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात पुढील २४ तासांत विजांच्या कडकडाटासह जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

राज्यातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला असून, तरी हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः विदर्भातील काही जिल्ह्यांसह मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा: पेट्रोल- डिझेलच्या दारात आज काय बदल? जाणून घ्या ११ जुलै 2026 चे ताजे दर

गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक धरणांमध्ये पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनासाठीही काही प्रमाणत दिलासा मिळाला आहे. मात्र, गेल्या दोन- तीन दिवसांत पावसाचा वेग कमी झाल्याने पाणीसाठ्यात वाढ होण्याचा वेग मंदावला आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते, राज्यात मान्सून सक्रिय असून वातावरणात पुरेसा ओलावा असल्याने पुढील काही दिवसांत पावसाचा जोर पुन्हा वाढू शकतो. काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार सरी, तर काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी विजांच्या कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यासह अनेक धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणांतील पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्याचवेळी पुणे आणि परिसरात गेल्या 24 तासांत पावसाने काहीशी विश्रांती घेतली असून, ढगाळ वातावरण कायम आहे.

दरम्यान, काही ग्रामीण भागांमध्ये पाण्याची टंचाई अद्यापही कायम आहे. नाशिक जिल्ह्यातील काही गावांमध्ये नियमित पाणीपुरवठ्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत असून, स्थानिक प्रशासनाकडे याबाबत निवेदने देण्यात आली आहेत.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भात आज पावसाची शक्यता अधिक असून, राज्यातील इतर भागांतही ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडू शकतात. पुढील काही दिवस हवामानातील बदल लक्षात घेता नागरिकांनी स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts