Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • मुसळधार पावसाचा फटका; मुंबई–पुणे एक्स्प्रेसवेवरील मिसिंग लिंक परिसरात स्लॅब कोसळला
Mumbai

मुसळधार पावसाचा फटका; मुंबई–पुणे एक्स्प्रेसवेवरील मिसिंग लिंक परिसरात स्लॅब कोसळला

Mumbai Pune Expressway

Mumbai Pune Expressway: मुंबई–पुणे एक्स्प्रेसवेवरील मिसिंग लिंक सुरू होऊन अवघे दोन महिने होत नाहीत तोच परिसरात स्लॅब कोसळल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमागचं नेमकं कारण काय, पाहूया.

सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावरील (Mumbai Pune Expressway) मिसिंग लिंक प्रकल्प (Missing Link project) परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. प्रवेशद्वाराजवळील संरचनेचा एक स्लॅब कोसळल्याने त्या भागातील वाहतूक विस्कळीत झाली असून प्रशासनाने वाहनचालकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे.

हेही क्लिक करा: 20 कोटींची आमदाराला ऑफर, राऊतांचा दावा लिंगाडे नावाचा आमदार कोण आहे? त्यांनाच का ऑफर?

लोणावळा आणि आसपासच्या घाट परिसरात

लोणावळा आणि आसपासच्या घाट परिसरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे डोंगरकड्यांवरून माती आणि दगड घसरून रस्त्यावर येत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक नियंत्रित करण्यात आली आहे. काही ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे. त्यामुळे दोन्ही बाजूच्या वाहतूक थांबण्यात आली.

परिस्थिती लक्षात घेऊन मुंबईकडे जाणारी वाहतूक उर्से टोलनाक्याजवळ थांबवण्यात आली आहे. महामार्ग पोलिस आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी तैनात असून मार्ग सुरक्षित करण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, खोपोली परिसरातील पाताळगंगा नदीची पाणीपातळी वाढल्याने नदीकाठच्या काही भागांमध्ये पाणी शिरल्याची माहिती समोर आली आहे. तसेच एक्स्प्रेसवेवरील काही सेवा केंद्रांमध्येही पावसाचे पाणी साचल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

सद्यस्थितीत मुसळधार पाऊस आणि दरड कोसळण्याचा धोका कायम असल्याने मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग तसेच जुना मुंबई–पुणे महामार्ग वापरणे टाळावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. गरजच असल्याशिवाय प्रवास करू नये आणि प्रवास करावाच लागल्यास वाहतूक पोलिस व प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.

यंत्रणांकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून पावसाचा जोर कमी झाल्यानंतर मार्गावरील स्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय जाहीर केला जाणार आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts