Petrol Diesel Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमतींमध्ये चढ- उतार सुरू असतानाही भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये आज कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी ११ जुलै 2026 साठी इंधनाचे दर स्थिर ठेवले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पश्चिम आशियातील भू-राजकीय घडामोडींमुळे जागतिक कच्चा तेलाच्या बाजारात अस्थिरता दिसून येत आहे. त्याचा परिणाम ब्रेंट आणि डब्ल्यूटीआय कच्चा तेलाच्या किमतींवर होत असून, जागतिक ऊर्जा बाजारावर त्याचे पडसाद उमटत आहेत.
मात्र, या पार्श्वभूमीवरही भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरांमध्ये (Petrol Diesel Price Today) कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे वाहनचालकांना सध्या तरी दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा: मोशी दुर्घटनेत 8 कामगारांचा अद्याप शोध सुरू; बचावकार्य कुठपर्यंत पोहोचले? जाणून घ्या
तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलाच्या किमती, रुपया – डॉलर विनिमय दर, वाहतूक खर्च आणि सरकारी कर यांसारख्या घडकांवर इंधनाचे दर अवलंबून असतात. त्यामुळे जागतिक परिस्थितीनुसार आगामी काळात दरांमध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, सध्या दरवाढीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
भारतातील सरकारी तेल कंपन्या दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे अद्ययावत दर जाहीर करतात. त्यामुळे वाहनधारकांनी इंधन भरण्यापूर्वी आपल्या शहरातील ताजे दार तपासून घेणे आवश्यक आहे.
आपल्या शहरातील पेट्रोल- डिझेलचे दर कसे तपासावे? (Petrol Diesel Price Today)
इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्यांच्या अधिकृत वेबसाइट, मोबाईल अॅप किंवा एसएमएस सेवेद्वारे आपल्या शहरातील अद्ययावत पेट्रोल आणि डिझेलचे दर सहज तपासता येतात.












