Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • Pune
  • मोशी दुर्घटनेत 8 कामगारांचा अद्याप शोध सुरू; बचावकार्य कुठपर्यंत पोहोचले? जाणून घ्या
ताज्या बातम्या

मोशी दुर्घटनेत 8 कामगारांचा अद्याप शोध सुरू; बचावकार्य कुठपर्यंत पोहोचले? जाणून घ्या

Moshi Building Collapse
Moshi Building Collapse: पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे घडलेल्या भीषण इमारत दुर्घटनेला ६४ तासांहून अधिक काळ उलटला असला, तरी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ८ कामगारांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य अद्याप सुरू आहे. आज हे बचावकार्य पूर्ण होणार का? सध्या शोधमोहीम कुठपर्यंत पोहोचली आहे? चला, जाणून घेऊया.

पिंपरी- चिंचवडमधील मोशी येथे घडलेल्या भीषण इमारत (Moshi Building Collapse) दुर्घटनेला ६४ तासांहून अधिक काळ उलटला असला, तरी बचावकार्य अद्याप सुरू आहे. इमारतीचा ढाचा अत्यंत धोकादायक स्थितीत असून तो कधीही कोसळू शकतो. तरीही NDRF, अग्रिशमन दल आणि इतर बचाव पथके अत्यंत काळजीपूर्वक शोधमोहीम राबवत आहेत.

हेही वाचा: २०३५ पर्यंत भारताचे स्वतःचे स्पेस स्टेशन! अंतराळात ते नेमके कसे उभारले जाणार? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली माहिती जाणून घ्या

दुर्घटनेनंतर एकूण २३ कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली होती. त्यापैकी १५ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असून, अजूनही ८ कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बचावकार्यासाठी अत्याधुनिक कटर मशीनच्या साहाय्याने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब हटविण्यात आला आहे. सध्या पहिल्या मजल्याचा स्लॅब हटविण्याचे काम सुरू असून, त्याखालीच अडकलेले कामगार असण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, आज बचावकार्य पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. Latest Marathi News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात मोशी दुर्घटनेचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रशासनामार्फत आवश्यक ती सर्व मदत देण्याचे निर्देश दिले. तसेच बचावकार्य आज रात्रीपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी मोशी येथील लेगसी वेस्टच्या बायोमायनिंग प्रक्रियेला तातडीने गती देण्याचे निर्देश दिले. दररोज साचणाऱ्या सुमारे 100 टन कचऱ्यावर त्वरित प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र आणि प्रभावी यंत्रणा उभारण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या. या बैठकीला आमदार महेश लांडगे, महापौर रवी लांडगे, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. LS Marathi Channel

नेमकी दुर्घटना कशी घडली?

8 जुलै 2026 रोजी दुपारी सुमारे 1.30 वाजता मोशी येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात ही दुर्घटना घडली. मुसळधार पावसामुळे कचरा डेपोमधील ‘लेगसी वेस्ट’चा प्रचंड ढिगारा घसरून तीन मजली प्रशासकीय इमारतीवर कोसळला.

या दुर्घटनेत इमारतीचा मोठा भाग कोसळल्याने अनेक कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकले. सुरुवातीला काही जणांची सुरक्षित सुटका करण्यात आली. मात्र, काही कर्मचारी अजूनही ढिगाऱ्याखाली असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. LS Marathi Latest News

बचावकार्यात NDRF, अग्निशमन दल, लष्कर आणि इतर आपत्कालीन यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहेत. विषारी वायू, अस्थिर इमारतीचा ढाचा आणि सतत पडणारा पाऊस यामुळे बचावकार्यात अनेक अडचणी येत आहेत.

या दुर्घटनेनंतर कचरा व्यवस्थापन, सुरक्षा उपाययोजना आणि प्रशासकीय निष्काळजीपणाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. Lokshevay Latest News

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts