भारताच्या आर्थिक विकासात आयटी क्षेत्राची मोठी भूमिका आहे. गेल्या काही वर्षापासून आय टी क्षेत्रात मंदी चालू असून पुण्यात आयटी क्षेत्राशी निअगडीत असलेल्या टीसीएस कंपनीने 2500 कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्यासाठी जबदस्ती केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पुण्यातील अग्रगण्य कंपनी टीसीएस ही कर्मचाऱ्यांप्रती सहानुभूती बाळगणारी कंपनी असल्याची चर्चा आहे. असे असतानाच याच कंपनीवर कर्मचाऱ्यांकडून राजीनामा मागवून घेण्यात येत असल्याची माहिती उघड झाली आहे. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संघटनेने हा आरोप केल्याची माहिती मिळाली असून नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉइज सेनेट NITES असे या संघटनेचे नाव आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉइज सेनेट NITES चे अध्यक्ष हरप्रीत सिंग सलुजा यांनी याबाबत पत्र लिहिले आहे. हा संपूर्ण प्रकार प्रकार अत्यंत लज्जास्पद आणि चुकीचा आहे. जबरदस्ती करण्यात आलेल्या या कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती त्यांनी केली आहे.
काय लिहिलेय पत्रात
टीसीएसने घेतलेल्या या निर्णयामुळे आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या अनुभवी लोकांवर नोकरीअभावाचा आघात करण्यात आलाय. ही नोकरी गमावलेले बहुतांश कर्मचारी हे मध्यम ते वरिष्ठ वर्गातील असून ते TCS कंपनीमध्ये 10 ते 20 वर्षे काम करत होते. यापैकी बरेच कर्मचारी 40 वर्षांवरील होते, या व्यक्तींवर कर्ज, मुलांचे शिक्षण आणि वृद्ध पालकांचा सांभाळ अशा विविध जबाबदाऱ्या आहेत. या जबाबदाऱ्या असतानाच अचानक नोकऱ्या मिळणे कठीण आहे. या निर्णयामुळे सगळ्या कर्मचाऱ्यांचे भविष्य संकटात सापडले असून कर्मचाऱ्यांसोबतच त्यांच्या कुटुंबीयांनाही याचा फटका बसणार असल्याचे मत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या पत्रात लिहिले आहे.
या प्रकरणी TCS ने सर्व आरोप ‘खोटे’ असल्याचे म्हंटले आहे. यासहा विशिष्ट हेतूने प्रेरीत असल्याचे म्हटले आहे. कंपनीमध्ये काही बदल होत असून याबदलांमुळे काही कर्मचाऱ्यांवर परिणाम झाला असून अशा कर्मचाऱ्यांची संख्या ही फार कमी आहे. ज्या कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यांना नियमानुसार भरपाई देण्यात आल्याचेही टीसीएसने म्हटले आहे. टीसीएसने जून महिन्यात जगभरातील आपल्या कार्लायातून 12,261 कर्मचारी कमी करणार असल्याचे जाहीर केले होते.