Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • ‘अजित पर्व’ संपलं! दादांवर आज ११ वाजता बारामतीमध्ये होणार अंत्यसंस्कार
Top News

‘अजित पर्व’ संपलं! दादांवर आज ११ वाजता बारामतीमध्ये होणार अंत्यसंस्कार

Ajit Era Ends Baramati Funeral

Ajit Era Ends Baramati Funeral : गेली अनेक दशकं महाराष्ट्राच्या राजकारणाचा अविभाज्य भाग राहिलेले कठोर प्रशासक, धडाडीचा नेता आणि खऱ्या अर्थान मास लीडर असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी अपघाती निधन झाले होते. बारामती येथील गोजुबावी येथे लँडिंगच्यावेळी त्यांचे विमान कोसळले होते. विमान कोसळल्यानंतर प्रचंड मोठा स्फोट झाला होता. यामध्ये अजित पवार आणि त्यांच्यासह विमानात असलेल्या सहा जणांचा मृत्यू झाला होता. अजित पवार यांच्या निधनाने बारामती आणि संपूर्ण राज्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला होता. अजित पवार यांच्यावर पार्थिवावर गुरुवारी सकाळी ११ वाजता बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यामुळे राज्यातील अजित पर्वाचा अंत होणार आहे.

हेही वाचा – उपमुख्यमंत्री पदाचा विक्रम करणाऱ्या अजितदादांची संपूर्ण राजकीय कारकीर्द

अजित पवार यांच्या अपघातानंतर त्यांचा मृतदेह बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला होता. याठिकाणी सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर काल संध्याकाळी अजित पवार यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात ठेवण्यात आले होते. यावेळी बारामतीची तमाम जनता अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी जमली होती. सामान्य बारामतीकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांना आपल्या लाडक्या अजितदादांना निरोप देताना शोक अनावर झाला होता. काही तास अजित पवार यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात ठेवल्यानंतर रात्री त्यांचा मृतदेह पुन्हा बारामती वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला.

विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्ययात्रा समाप्त होईल

अजित पवार यांचे पार्थिव बारामतीमध्ये असलेल्या काटेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येईल. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ९ वाजेपर्यंत पार्थिव काटेवाडी येथे ठेवण्यात येईल. सकाळी ९ वाजता काटेवाडी येथून अंत्ययात्रेला सुरुवात होईल आणि तिथून विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्ययात्रा समाप्त होईल. या पार्श्वभूमीवर त्यांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यानंतर ११ वाजता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अजित पवार यांना शेवटचा निरोप दिला जाईल.

राज्यातील आणि केंद्रातील मोठे नेते दाखल होणार

अजित पवार यांच्या अंत्यविधीसाठी बारामती येथे अनेक राज्यातील आणि केंद्रातील मोठे नेते दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर बारामती विमानतळावर पोलिसांसह एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यविधीसाठी येणारे सर्व व्हिआयपी बारामती विमानतळ येथे पोहोचतील. त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस पथक आणि एनडीआरएफला पाचारण करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अत्यंविधीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह विविध मान्यवर बारामतीला पोहोचणार आहेत.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts