Ajit Pawar Baramati visit : सध्या सर्वत्र महापालिका निवडणुकांची तयारी असून सध्या AB फॉर्मचे वाटप आणि उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सध्या बारामती दौऱ्यावर आहेत. त्यांनी कडाक्याच्या थंडीत बारामतीतील हॉटेल व्यावसायिकांच्या आग्रहास्तव चहाचा आस्वाद घेतल्याची माहिती समोर आली आहे.
View this post on Instagram
विकास कामांची पाहणी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर असून त्यांनी नेहमीप्रमाणे भल्या पहाटे पाच वाजताच विकासकामांची पाहणी सुरू केली. विविध विकासकामांचा आढावा घेत असताना एका ठिकाणी स्ट्रीट फूडसाठी उभारण्यात आलेल्या शॉप्सची त्यांनी पाहणी केली. यावेळी तेथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या चहाच्या दुकानाची माहिती घेत असताना संबंधित व्यावसायिकाने कडाक्याच्या थंडीत चहा घेण्याचा आग्रह केला. व्यावसायिकांच्या आग्रहाला मान देत उपमुख्यमंत्री श्री. अजित दादा पवार यांनी चहाचा आस्वाद घेतला.
हे ही वाचा : भाजप कडून एबी फॉर्मचं वाटप पूर्ण; ‘माजी’च्या चिरंजीवांना संधी
चाय पे चर्चा
चहा घेत असताना दादांनी उपस्थितांशी संवाद साधत दुधाच्या व्यवसायासंदर्भात चर्चा केली. दूध उत्पादक, व्यावसायिक आणि स्थानिक उद्योजकांना भेडसावणाऱ्या अडचणी जाणून घेत त्यावर उपाययोजनांबाबतही त्यांनी विचारमंथन केले. या प्रसंगी दादांचा साधेपणा आणि सर्वसामान्य व्यावसायिकांशी असलेला थेट संवाद पुन्हा एकदा पाहायला मिळाला.












