Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • भाजपला बाजूला ठेवून अजित पवार शिंदे सेनेची परळीत एमआयएमसोबत युती
Top News

भाजपला बाजूला ठेवून अजित पवार शिंदे सेनेची परळीत एमआयएमसोबत युती

Ajit Pawar Shinde Sena AIMIM alliance Parli

Ajit Pawar Shinde Sena AIMIM alliance Parli : महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत युती, आघाडी यांनाही जोर चढला आहे. दोनच दिवसांपूर्वी राज्यात एका संभाव्य युतीने मोठा स्फोट झाला होता. अंबरनाथमध्ये भाजपने काँग्रेसशी हातमिळवणी केली होती तर अकोटमध्ये भाजपने सत्तेसाठी चक्क ऑल इंडिया इत्तेहादूल मुस्लिमीन (AIMIM) शी युती केली होती. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. त्यातच आता बीडच्या परळीत अजित पवार यांची राष्ट्रवादी, शिंदेच्या शिवसेनेने एमआयएमसोबत युती केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या विचित्र युतीची राज्यभर चर्चा रंगली आहे. त्याचबरोबर भाजपला यामध्ये दूर ठेवल्याचे दिसून येत आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी परळीत एकत्र निवडणूक लढवली होती. मात्र, भाजपला दूर ठेवत ही विचित्र युती समोर आल्याचे राज्यात परळी चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. 

हेही वाचा – दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सुप्रिया सुळेंकडून मोठा खुलासा

अंबरनाथ, काटोल येथील युतीच्या प्रकारामुळे राज्यातील तापलेलं वातावरण अजून शांत झालेलं नसतानाच आता महायुतीत भाजपसोबत सत्तेत असलेले त्यांचे मित्रपक्ष म्हणजेज शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनीही भाजपच्या पावलावर पाऊल टाकल्याचं दिसत आहे. भाजपनंतर शिंदे आणि अजितदादांची एमआयएमसोबत युती झाल्याची माहिती समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील परळ नगरपालिकेत शिंदे गट, एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे एकत्र आले आहेत. त्यामुळे पुन्हा मोठी खळबळ माजली आहे.

गटनेता निवडीत शिवसेना शिंदे गटाची चक्क एमआयआमसोबत युती

परळीमध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर आता नवीन समीकरणं पहायला मिळत आहेत. त्याचं कारण म्हणजे अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाने चक्क ऑल इंडिया इत्तेहादूल मुस्लिमीन (AIMIM) शी गटनेता निवडीत युती केली आहे. खरंतर नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्र पक्षाच्या गटात मंत्री पंकजा मुंडे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आक्षेपार्ह आरोप करत निवडून आलेल्या एमआयएमच्या सदस्याचा समावेश करण्यात आला आहे, पण आता या निर्णयाची चांगलीच चर्चा होऊ लागली आहे.

गटनेतेपदी अजित पवार गटाच्या वैजनाथ सोळंके यांची निवड

परळी नगरपरिषद निवड बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्र पक्षाच्या गटनेतेपदी नगरसेवक वैजनाथ सोळंके यांची निवड करण्यात आली. या गटात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, मित्रपक्ष, अपक्ष – 2 अशा 24 जणांचा समावेश आहे. तसेच या मित्र पक्षांमध्ये एमआयएमच्या नगरसेविका शेख आयशा मोहसीन यांचाही समावेश आहे. उर्वरित सदस्यांमध्ये अपक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, आणि शिंदे सेना यांच्या नगरसेवकांचा समावेश आहे.

विचित्र युतीने अनेकाच्या भुवया उंचावल्या आहेत

नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एमआयएमच्या उमेदवार शेख आयेशा मोसीन यांच्या प्रचारार्थ एम आय एम चे प्रदेश सरचिटणीस समीर बिल्डर यांनी सभा घेतली. या सभेत मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत शेरेबाजी करण्यात आली. त्यानंतर त्या प्रभागात काँग्रेस आणि एमआयएमचे उमेदवार विजयी झाले. मात्र, एमआयएमचे हेच उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात सामील झाले आहेत. त्यामुळे मोठी खळबळ माजली असून या युतीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts