Akola municipal council elections : अकोला जिल्ह्यात वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर, माजी मंत्री रामदास बोडखे, भाजप आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, आमदार अमोल मिटकरी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर अनेक ठिकाणी महायुतीतच रस्सीखेच बघायला मिळत आहे. तर अकोट मध्ये माजी मंत्री रामदास बोडखे यांची सून आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष यांच्या पत्नी निवडणूक रिंगणात असल्याने आमदार मिटकरी यांची प्रतिष्ठा पणाला आहे.
याशिवाय मूर्तिजापूर मध्ये भाजप आमदार हरीष पिंपळे यांचे भाऊ नगरसेवक पदाच्या रिंगणात उतरलेत. तर बाळापूर मध्ये माजी आमदार नातिकोद्दीन खातीब आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आणि हिवरखेड मध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गट आमने सामने आलेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या ठिकाणी सभा झाल्या असून याठिकाणी पहिल्यांदाच नगरपरिषद निवडणूक होत आहे.
नगराध्यक्ष उमेदवार
मूर्तिजापूर
हर्षल साबळे – भाजप
अशोक दुबे – काँग्रेस
शुभम मोहोळ – शिवसेना शिंदे गट
कृष्णराव गावंडे – राष्ट्रवादी अजित पवार गट
हिवरखेड
सुलभा धुतोंडे – भाजप
शोभा घोंगळे – शिवसेना शिंदे गट
सुनंदा गिरे – काँग्रेस
आचल ओंकारे – राष्ट्रवादी अजित पवार गट
अकोट
अलका बोडखे – काँग्रेस
स्वाती चिखले – वंचित
गाजिया बानू बद्रू जमा – राष्ट्रवादी अजित पवार गट
माया धुळे – भाजप
चंचल पितांबर वाले – शिवसेना शिंदे
हे ही वाचा : सोशल मिडीयावर पोस्ट! शरद पवारांच्या विश्वासू सहकाऱ्याचा राजकारणातून संन्यास..
तेल्हारा
विद्या शामस्कर – वंचित
वैशाली पालीवाल – भाजप
दीपा सिसोदिया – शिवसेना शिंदे
राजकन्या पवार – राष्ट्रवादी अजित पवार गट
शिवानी थाठे – सेना उबाठा
बाळापुर नगरपरिषद
अकीला बी मोहम्मद अनीस – एमआयएम
आफरीन परवीन मोहम्मद जमीर – काँग्रेस.
धनश्री अंबाडे – भाजप
रजिया खतीब – वंचित बहुजन आघाडी .
बार्शीटाकळी नगरपंचायत
अमीना अंजुम – काँग्रेस
कोकिळा येळवणकर – भाजप
रूपाली गोल्डे – शिवसेना शिंदे
वनमाला मुळे – शिवसेना उबाठा
अख्तर खातून अलीमोद्दीन-वंचित
भंडाऱ्यात 4 नगरपालिकेसाठी राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांची प्रतिष्ठा पणाला
भंडारा, तुमसर पवनी, साकोली या चार नगरपालिकेसाठी मतदान झाला आहे. चार नगराध्यक्ष आणि शंभर नगरसेवक पदासाठी भंडारा जिल्ह्यात अत्यंत चूरशीची निवडणूक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रत्येकी दोन मोठ्या सभा पार पडल्या, त्यासोबतच नाना पटोले, प्रफुल पटेल आणि परिणय फुके यांनी चारही ठिकाणी मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढलं. शिंदे सेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी त्यांच्या पत्नीला भंडाऱ्यात नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक रिंगणात उतरवलं तर काँग्रेसकडून महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा जयश्री बोरकर, भाजपकडून मधुरा मदनकर, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून सुषमा साखरकर या निवडणूक रिंगणात उभ्या होत्या. जिल्ह्यातील चारही नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, भाजपचे परिणय फुके आणि शिंदे सेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.












