Shiv Sena leaders vehicle attack Pune : गेल्या काही दिवसांपासून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभा, रॅली मोठ्या प्रमाणात सुरु आहे. काही ठिकाणी राजकीय पक्षांच्या कार्यर्त्यांवर तर निवडणुकीत उभ्या राहिलेल्या उमेदवारांवर हल्ले होतानाचा बातम्या काही दिवसांपासून सतत ऐकायला येत आहे. आता पुण्यात देखील अशाच प्रकारचा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
काय आहे प्रकरण
पुणे शहरात महापालिकेच्या निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू असताना सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. तसेच सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप होताना पाहायला मिळत असला तरीही पुण्यात धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे आणि प्रभाग क्रमांक 41 चे शिवसेनेचे उमेदवार सारिका पवार यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केलं असून त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे.
हे ही वाचा : भारताचे ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ निसर्गप्रेमी डॉ. माधव गाडगीळ यांनी 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
सारिका पवार यांच्यावर हल्ला
प्रभाग क्रमांक 41 मध्ये शिवसेनेचे उमेदवार सारिका पवार हे प्रचार करत असताना यांच्यावर काही हल्लेखोरांनी हल्ला केलं असून ते त्यात जखमी झाले असून शहराध्यक्ष नाना भानगिरे हे देखील प्रचाराला गेले असताना त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पोलिसांकडून याबाबत चौकशी सुरू आहे तसेच शिवसेनेच्या शहराध्यक्ष नाना भानगिरे यांच्याकडून देखील तक्रार दाखल करण्याचा काम सुरू आहे.
#WATCH | Pune, Maharashtra | Shiv Sena leader Pramod Nana Bhangire said, “While I was holding a public meeting for election campaigning in a society near Shreeram Chowk, some people pelted stones at my car and also targeted our candidate Sarika Pawar…. The police have gone to… pic.twitter.com/u2oLbCyrpm
— ANI (@ANI) January 8, 2026
पोलीस तपास सुरु
या संपूर्ण घटनेनंतर परिसरामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात असून हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.












