Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • बारामती विमान अपघातातील विमानाचा ब्लॅकबॉक्स सापडला; आता अपघाताचे खरे कारण उलगडणार
Top News

बारामती विमान अपघातातील विमानाचा ब्लॅकबॉक्स सापडला; आता अपघाताचे खरे कारण उलगडणार

Ajit Pawar Death

Baramati plane crash black box : महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल विमान अपघातात निधन झाले. आज ते अनंतात विलीन झाले. अजित दादांसह 5 जणांचाच या विमान अपघातात मृत्यू झाला. आता या विमानाचा blackbox अखेर सापडला आहे. आता या ब्लॅकबॉक्स च्या माध्यमातून अपघाताचे खरं कारण समोर येईल.

वेळेचे पक्के असलेले दादा नेहमीप्रमाणे सकाळी उठून त्यांच्या कामकाजास लागले. त्यानंतर बारामतीत 4 सभा असल्याने मुंबईहून बारामती जाण्यासाठी ते त्यांच्या चार्टड विमानाने निघाले. परंतु बारामती विमानतळावर लँडिंग करतानाच विमान क्रॅश होऊन विमानाचा स्फोट झाला. या अपघातामध्ये अजित दादांसह 5 जणांचा मृत्यू झाला. अपघातानंतर विमानातील ब्लॅकबॉक्स चा शोध घेणे सुरु होते. आता हा ब्लॅकबॉक्स सापडला असून अपघाताचे खरं कारण समोर येईल. बारामती येथे अपघातग्रस्त लियरजेट विमानाचा ब्लॅकबॉक्स सापडल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

अजित दादा पवार हे लिअरजेट 45 विमानाने प्रवास करत होते. हे विमान अत्यंत कडक सुरक्षा मानकांनुसार बनवण्यात आले आहे. या विमानात फ्लाईट डेटा रेकॉर्डर FDR आणि कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर CVR दोन्ही उपलब्ध आहे. FDR आणि CVR या दोन्ही बाबींच्या एकत्रीकरणाला ब्लॅक बॉक्स म्हणतात. हा ब्लॅकबॉक्स काळ्या रंगाचा नव्हे तर नारंगी रंगाचा आहे. याचा रंग नारंगी ठेवण्यामागे कारण म्हणजे जर हा बॉक्स अपघातानंतर कोणत्या ढिगाऱ्यात किंवा कचऱ्यात आणि घनदाट जंगलात पडले तर ते लवकर सापडावे यासाठी त्याचा रंग नारंगी ठेवण्यात आला आहे. आता हा ब्लॅकबॉक्स ताब्यात घेण्यात आला आहे.

ब्लॅकबॉक्स हे उपकरण विमानातील प्रत्येक हालचालींची नोंद करते. विमानात अपघात होण्यापूर्वी जे काही बोलणे झाले ते या ब्लॅकबॉक्स मध्ये रेकॉर्ड होते. कोणत्याही प्रकारचा स्फोट, टक्कर, तीव्र आग, उच्च तापमान आणि पाणी अशा कोणत्याही अपघातापासून वाचण्यासाठी ब्लॅक बॉक्स विशिष्ट पद्धतीने डिझाइन करण्यात येते. मूलतः डेटा साठवून त्या डेटाच्या माध्यमातून विमान अपघाताचे गूढ आणि त्याचे कारण समजणं सोपे होते. यामुळे अपघाताचे खरे कारण समोर येण्यास मदत होते. अजित पवार यांच्या चार्टड विमानात देखील हा ब्लॅकबॉक्स कार्यान्वित होता. बारामतीत झालेला विमान अपघात आता अपघाताचे कारण शोधण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

महाराष्ट्राचे लाडके अजित दादा यांच्यावर आज शासकीय इमामा अंत्यसंस्कार करण्यात आले असून यावेळी अनेक राजकीय नेत्यांनी दादांचे अंतिम दर्शन घेतले. उपस्थित मान्यवर, राजकीय नेत्यांनी आणि बारामतीत जमलेल्या जनसमुदायाने अजित दादांना श्रद्धांजली अर्पण करत अखेरचा निरोप दिला. आता अपघाताचे खरे कारण नेमके काय याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts