Municipal Council Election Results : राज्यभरातील नगरपरिषद, नगरपंचायतींसाठीची मतमोजणी आज सकाळी 10 वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. आता राज्यातील विविध विजयी नगसेवकांची यादी समोर येत आहे. जामनेर, अनगर आणि दोंडाईचा या तीन नगरपंचायतीमधील सर्व जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आज एकूण 287 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतमोजणी पार पडली. केवळ महायुतीच नव्हे तर महाविकास आघाडीतील पक्षही अनेक ठिकाणी एकमेकांविरुद्ध रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे आजच्या निकालाबाबत संपूर्ण राज्याला कमालीची उत्सुकता लागली आहे.
राज्यातील अनेक नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचे निकाल आता हाती येत आहेत. परळीत मुंडे बंधू-भगिनीने आपला परळीचा बालेकिल्ला राखला आहे. गेवराईत अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित यांना धक्का बसला आहे. भाजपचे माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या भावजय गीता पवार या विजयी झाल्या आहेत.
हेही वाचा – शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! आमदाराच्या मुलाचा भाजपात प्रवेश
गेवराई नगर परिषदेचा निकाल समोर
बीड गेवराई नगर परिषदेतील एकुण 10 नगरसेवक पदासाठीचा निकाल जाहीर झाला असून भाजपचे 8 नगरसेवक विजयी तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 नगरसेवक विजयी झाले आहेत. नगराध्यक्ष पदाच्या भाजपच्या उमेदवार आघाडीवर तर अजित पवारांचे राष्ट्रवादीचे उमेदवार पिछाडीवर आहेत.
बीड जिल्ह्यात भाजपचा डंका
बीड जिल्ह्यात भाजपचा डंका वाजत असून सर्वत्र भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. सहापैकी सहा ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आघाडीवर आहेत. बीड, माजलगाव, धारूर, गेवराई येथे भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. परळीत भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी या आघाडीवर असून, अंबाजोगाई येथे भाजपचे नेते नंदकिशोर मुंदडा विजयी आहेत. तिथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार राजकिशोर मोदी यांना पराभवाचा धक्का बसला आहे.
गेवराई मध्ये 14 पैकी भाजपचे 10 नगरसेवक
बीडमध्ये आत्तापर्यंत 8 नगरसेवक पदाचे निकाल जाहीर यामध्ये भाजपचे तीन अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे तीन तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. गेवराई मध्ये 14 पैकी भाजपचे 10 नगरसेवक असून तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांना विजय मिळाला आहे.
अंबाजोगाईत नंदकिशोर मुंदडा विजयी
माजलगावात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विजयी मोहरीन शिफा बिलाल चाऊस या 2323 मतांने विजयी झाल्या आहेत. परळीत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे उमेदवार पद्मश्री धर्माधिकारी हे विजयी झाले आहे. अंबाजोगाईत शहर परिवर्तन जनविकास आघाडीचे उमेदवार नंदकिशोर मुंदडा हे 2400 मतांनी विजयी झाले आहेत. गेवराईत भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार गीता बाळराजे 1500 मतांनी विजयी झाल्या आहेत. धारुर मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बाळासाहेब जाधव 694 मतांनी विजयी झाले आहेत. तर बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदांच्या उमेदवार प्रेमलता पारवे या 455 मतांनी आघाडीवर आहेत.






