• Home
  • राजकारण
  • शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! आमदाराच्या मुलाचा भाजपात प्रवेश
Pune

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! आमदाराच्या मुलाचा भाजपात प्रवेश

Surendra Pathare joins BJP

Sharad Pawar NCP setback : काही दिवसांपूर्वी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा केली. त्यानंतर पक्षांतर करण्याला वेग आला आहे. अशातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्या मुलाने भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे पुणे महापालिकेच्या तोंडावर हा पक्षप्रवेश भाजपसाठी मोठा महत्त्वाची मानला जात आहे, तर राष्ट्रवादीचा हाणी करणारा आहे.

हेही वाचा – सोशल मिडीयावर पोस्ट! शरद पवारांच्या विश्वासू सहकाऱ्याचा राजकारणातून संन्यास..

राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाकडून उमेदवारांच्या मुलाखती सुरू झाल्या आहेत. त्यामुळे सर्व पक्ष तयारीत व्यस्त आहेत. अनेक नेत्यांनी आपापल्या सोयीनुसार भाजपमध्ये प्रवेश केले आहेत. अशातच पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर एका आमदाराच्या घरात फूट पडली आहे. या आमदाराच्या मुलाने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपची ताकद वाढली आहे.

सुरेंद्र पठारे व सायली वांजळे यांचा भाजपात प्रवेश

शरद पवार गटाचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे सुपुत्र सुरेंद्र पठारे यांच्यासह दिवंगत माजी आ. रमेश वांजळे यांच्या कन्या सायली वांजळे, माजी नगरसेवक सचिन दोडके, माजी नगरसेविका रोहिणी चिमटे, बाळासाहेब धनकवडे, विकास दांगट, नारायण गलांडे, प्रतिभा चोरगे, पायल तुपे, प्रशांत तुपे, शुभांगी ढोले, संतोष मते, काँग्रेस नेते व माजी मंत्री वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र कणव चव्हाण, मुळशी तालुक्यातील उबाठा गटाचे कार्यकर्ते व पंचायत समिती माजी सभापती भानुदास पानसरे, उपतालुका प्रमुख गणेश पानसरे, कृष्णकुमार पानसरे, श. प. गटाचे तालुका अध्यक्ष आनंद माझिरे, उपाध्यक्ष संतोष पानसरे, सरचिटणीस सुहास पानसरे, उपाध्यक्ष किरण साठे, सचिन पानसरे या नेत्यांनी आणि पदाधिकांऱ्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, माजी आ. संग्राम थोपटे, भाजपाचे पुणे जिल्हाध्यक्ष धीरज घाटे, माजी सभागृह नेते गणेश बिडकर, भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, श्रीनाथ भिमाले, योगेश मुळीक यांच्यासह भाजपाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts