Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • बृहन्‍मुंबई महानगरपालिका निवडणुकीत 23 मतमोजणी कक्षात आज सकाळी 10 वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार
Mumbai

बृहन्‍मुंबई महानगरपालिका निवडणुकीत 23 मतमोजणी कक्षात आज सकाळी 10 वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार

Renaming Mumbai Roads

BMC Election Vote Counting: बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 अंतर्गत झालेल्या मतदानाची मतमोजणी प्रक्रिया आज सकाळी 10 वाजेपासून विविध ठिकाणच्‍या 23 मतमोजणी कक्षात होणार आहे. या मतमोजणी प्रक्रियेसाठी तयार करण्यात आलेल्या सविस्तर आराखड्यास महानगरपालिका आयुक्त तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी श्री. भूषण गगराणी यांनी मंजुरी दिली आहे. त्यानुषंगाने आता भारत निवडणूक आयोग यांच्या मार्गदर्शक सूचनांचे आणि तसेच आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. याशिवाय मतमोजणीदरम्यान सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन तसेच कायदा व सुव्यवस्था याबाबत आवश्यक ती दक्षता घेण्यात आली आहे.

महानगरपालिका आयुक्त तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी श्री. भूषण गगराणी यांनी आज मतमोजणी व्यवस्थेचा आढावा घेतला. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) श्री. विजय बालमवार, सहआयुक्‍त (करनिर्धारण व संकलन) श्री. विश्‍वास शंकरवार, अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी (कोकण विभाग) श्रीमती फरोग मुकादम, सहायक आयुक्‍त (करनिर्धारण व संकलन) श्री. गजानन बेल्‍लाळे, उपजिल्‍हाधिकारी श्री. महादेव किरवले यांच्‍यासह २३ निवडणूक निर्णय अधिकारी (R.O.) उपस्थित होते.

हे ही वाचा : आज सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होणार; याठिकाणी पार पडेल प्रक्रिया

सुरक्षा बंदोबस्त तैनात

महानगरपालिका आयुक्त श्री. गगराणी यांनी सांगितले की, माननीय भारत निवडणूक आयोगाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून निवडणूक मतमोजणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत व वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रांची रचना व नियोजन, टेबल मांडणी, अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक, सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा, तसेच अग्निशमन व वैद्यकीय सुविधा यांचा सविस्तर आढावा घेऊन त्याबाबतचा तपशील अंतिम करण्यात आला आहे. मतमोजणीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यामुळे पोलीस विभागाशी समन्वय साधण्यात आला आहे. आवश्यक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, असेही श्री. गगराणी यांनी स्पष्ट केले.

मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पाडावी

मतमोजणीसाठी ७५९ पर्यवेक्षक आणि ७७० सहायक यांच्‍यासह ७७० चतुर्थश्रेणी कर्मचारी यांची नियुक्त करण्यात आली आहे. मतमोजणी अधिकारी, पर्यवेक्षक व सहाय्यक कर्मचाऱ्यांना पूर्व प्रशिक्षण देण्यात आले आहे. मतमोजणी केंद्र परिसरात वाहतूक नियंत्रण, वाहनतळ व्यवस्था तसेच प्रसारमाध्यमांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहेत. निकाल जाहीर करताना अचूकता व पारदर्शकता राखण्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. मतमोजणी प्रक्रिया शांततापूर्ण व विश्वासार्ह पद्धतीने पार पाडावी, नागरिकांचा लोकशाहीवरील विश्वास अधिक दृढ व्हावा, या दृष्टीने सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कामकाज करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त श्री. गगराणी यांनी दिले आहेत.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts