Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • 14 महापालिकांमध्ये असणार महिलाराज; जाणून घ्या तुमच्या शहरात कोण असणार महापौर
ताज्या बातम्या

14 महापालिकांमध्ये असणार महिलाराज; जाणून घ्या तुमच्या शहरात कोण असणार महापौर

Women Mayors in Municipal Corporations

Women Mayors in Municipal Corporations : महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर झाला. त्यानंतर महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत सुरु झाली आहे. आरक्षण सोडतची तयारी सुरु होण्यापूर्वीच महापौर नेमका कोणाचा होईल याची चर्चा चांगलीच रंगल्याचे बघायला मिळाले होते. मुंबई महापालिकेत महापौर भाजपचा होणार की शिंदेंचा यावर सर्वांचे लक्ष लागून होते. महापालिका निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली. एवढेच नाही तर पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये देखील भाजपने विजय मिळवला. मग आता महापौर कोणाचा होणार यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. हे आरक्षण लॉटरी पद्धतीने हे जाहीर करण्यात आले असून 29 पैकी 14 महानगरपालिकांमध्ये महिला राज असणार असल्याचे समोर आले आहे.

राज्यातील 29 महापालिकांमधील महापौर पदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले असून अनुसूचित जमातीसाठी 1 , अनुसूचित जाती – 3 , नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) – 8, सर्वसाधारण – 17 याप्रमाणे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. हे आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे बघायला मिळत आहे. तर ठाकरे गटाकडून गोंधळ घालण्यात येत असल्याचे देखील बघायला मिळाले. बघूयात कोणत्या 14 महापालिकांमध्ये असणार आहे महिला राज.

हे ही वाचा : महापालिकांच्या आरक्षणाची सोडत जाहीर; तुमच्या शहराचा महापौर कोण?, वाचा संपूर्ण यादी

याठिकाणी असणार महिलाराज

उल्हासनगर, पनवेल, कोल्हापूर, इचलकरंजी या जिल्ह्यात इतर मागास प्रवर्ग ओबीसी मधून महापौरपदासाठी महिलांना आरक्षण मिळाले आहे. तर लातूर जालना या जिल्ह्यात अनुसूचित जाती प्रवर्गात महिलांना आरक्षण देण्यात आले आहे. तर मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, धुळे, मिरा-भाईंदर, मालेगाव, सोलापूर , अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात सर्वसाधारण प्रवर्गात देखील महिलांना आरक्षण देण्यात आले आहे.

भाजपचा मार्ग मोकळा

मुंबई महापालिकांची आरक्षण सोडत नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसळ यांच्या अध्यक्षतेखाली सुरु होते. काही ठिकाणी SC तर काही ठिकाणी ST तर काही ठिकाणी OBC गटाला आरक्ष जाहीर झाले आहे. मुंबई महापौरपद महिलांसाठी राखीव झाले असून खुल्या प्रवर्गासाठी म्हणजेच ओपन कॅटेगरीसाठी जाहीर झाले आहे. म्हणजेचं यावरून लक्षात येते कि, आता मुंबईत भाजपचा महापौर होण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे. तर एकीकडे आरक्षण सोडत प्रक्रियेवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts