Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर
Top News

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर

Congress star campaigners list

Congress star campaigners list : सध्या राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाली सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या प्रचार सभा, मेळावे आणि रॅलींचे आयोजन करण्यात येईल. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी उडवल्या जातील. पहिल्या टप्प्यात राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी येत्या ५ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल तर ७ जानेवारी रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.

हेही वाचा –  मराठी महिलेला गुजराती टेलरकडून शिवीगाळ, मनसे स्टाईलने धुलाई

स्टार प्रचारकांच्या यादीत दिग्गजांचा समावेश

महाराष्ट्र काँग्रेसने प्रसिद्ध केल्या ४० स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार, खासदार छत्रपती शाहू महाराज, विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खासदार मुकुल वासनिक, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, खासदार रजनीताई पाटील, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांसारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.

इम्रान प्रतापगढी, अमित देशमुख, प्रणिती शिंदे, विश्वजित कदमांचा समावेश

या यादीमध्ये अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी, राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे, अखिल भारतीय कार्य समितीचे सदस्य नसीम खान, अखिल भारतीय कार्य समितीच्या सदस्या यशोमती ठाकूर, खासदार प्रणिती शिंदे, आमदार अमिन पटेल, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, आमदार अमित देशमुख, आमदार डॉ. विश्वजित कदम, अनिस अहमद, माजी मंत्री रमेश बागवे, माजी खासदार हुसेन दलवाई, आमदार साजिद खान पठाण, माजी मंत्री वसंत पुरके, माजी आमदार धिरज देशमुख, रामहरी रुपनवर, एम. एम. शेख, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे, मुफ्ती हारुन नदवी, शाह आलम शेख, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे, अक्षय राऊत व हनुमंत पवार यांचा या यादीत समावेश आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts