Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • काँग्रेस नेते हिदायत पटेल यांच्यावर चाकूहल्ला:अकोल्यात उपचारादरम्यान मृत्यू
Top News

काँग्रेस नेते हिदायत पटेल यांच्यावर चाकूहल्ला:अकोल्यात उपचारादरम्यान मृत्यू

Congress leader Hidayat Patel stabbed : राजकीय पूर्ववैमनस्यातून अकोट तालुक्यात काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांची निर्घृण हत्या करण्यात आली. बुधवारी दुपारी अकोट तालुक्यातील मोहाळा येथे नमाज पठणानंतर मशिदीबाहेर चाकूने प्राणघातक हल्ला झाल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्यांना अकोला येथील ओझोन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान आज पहाटे साडेतीन वाजता त्यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, हिदायत पटेल हे माहोळ गावात असताना काही हल्लेखोरांनी त्यांना घेरले आणि धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात पटेल यांच्या पोटावर आणि मानेवर खोलवर जखमा झाल्या आहेत. भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात मोठी पळापळ झाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पटेल यांना तातडीने अकोट येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, अतिरक्तस्राव आणि जखमांचे गांभीर्य लक्षात घेता, प्राथमिक उपचार करून त्यांना तातडीने अकोला येथील मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

हे ही वाचा : ‘छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार होते’; भाजपच्या मोठ्या नेत्याचं वक्तव्य

काकाच्या हत्येचा बदला 24 मे 2019 रोजी लोकसभा निवडणुकीदरम्यान मोहाळा येथे भाजप अल्पसंख्याक सेलचे माजी पदाधिकारी मतीन शेरखाँ पटेल (58) यांची हत्या झाली होती. या प्रकरणी हिदायत पटेल यांच्यासह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून, त्याची सुनावणी सुरू आहे. त्यामुळे आपल्या काकाच्या हत्येचा बदला घेण्याच्या उद्देशातून हिदायत पटेल यांच्यावर मृत मतीन पटेल यांचा पुतण्या उबेद पटेल याने चाकूने हल्ला केल्याची घटना घडल्याची माहिती गावातील काही प्रत्यक्षदर्शींकडून मिळाली. आमचा त्या दिशेने तपास सुरू आहे, असे अकोट पोलिसांनी सांगितले.

अकोल्यात पोलिसांचा कडक बंदोबस्त

हिदायत पटेल यांच्यावर हल्ला झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच अकोला आणि अकोटमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने रुग्णालयाबाहेर गर्दी केली. कार्यकर्त्यांमधील संताप पाहता आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी अकोला शहरासह माहोळ गावात कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

हिदायत पटेलांनी लढवली लोकसभा

हिदायत पटेल हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि अकोला जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते. त्यांनी 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचा एक आक्रमक आणि महत्त्वाचा चेहरा म्हणून हिदायत पटेल यांची ओळख आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts