Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • “अजितदादांवरील आरोपांचे गाठोडे समुद्रात नेऊन बुडवावा, ती त्यांना आदरांजली ठरेल”;रोहित पवारांची मागणी
Top News

“अजितदादांवरील आरोपांचे गाठोडे समुद्रात नेऊन बुडवावा, ती त्यांना आदरांजली ठरेल”;रोहित पवारांची मागणी

Rohit Pawar's demand

Rohit Pawar’s demand : आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनंतर विधानसभेत शोकप्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या स्मृतींना उजाळाला दिला. यावेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनीदेखील भाषणात अजितदादा यांच्या आठवणी ताज्या केल्या. यावेळी बोलताना त्यांनी अजितदादांवरील सर्व आरोपांचं गाठोडे समुद्रात नेऊन बुडवावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली. तसेच काकींच्या मदतीला मी कायम उभा असेल, असं आश्वासनही त्यांनी दिलं.

हेही वाचा – ‘शरद पवार नसते तर महाराष्ट्र पेटून उठला असता’; भास्कर जाधवांनी अधिवेशनादरम्यान अजित पवारांच्या मृत्यूबद्दल उपस्थित केली शंका

“…तर ती त्यांना आदरांजली ठरेल”- रोहित

सभाग्रहात बोलताना, अजित पवार हे सभागृहात पहिला येणारा आणि शेवटी जाणारा नेता असायचे. चुकले तर कान पकडायचे व चांगले बोललो की स्तुती करायचे. व्यक्तिगत, बेकायदेशीर विषय घेऊन आलेल्यांचा त्यांना राग यायचा, अशी आठवण रोहित पवार यांनी काढली. दादांवर नको नको ते आरोप झाले. दादा तेव्हा अस्वस्थ व्हायचे. पण एकही आरोप सिद्ध करता आला नाही. दादा आता नाहीत, त्यामुळे ते आरोप व ते डाग आता पुसले पाहिजेत. आरोपांचे गाठोडे समुद्रात टाकले गेले तर ती त्यांना आदरांजली ठरेल, अशी मागणीही त्यांनी केली.

माझे लग्न हे दादांनी ठरवले होते – रोहित पवार

माझे लग्न हे दादांनी ठरवले होते. पक्ष वेगळा झाला तेव्हा काही गोष्टी बोलल्या गेल्या असतील. गेल्या काही महिन्यात आमच्या बैठका झाल्या. प्रशासनावर वचक असणारा नेता गेला. लोकनेता गेला, रूबाब गेला. रांगडेपणा गेला. राज्याच्या राजकारणातील मिश्किलपणा गेला, अशा शब्दांत त्यांनी हळहळ व्यक्त केली. अजितदादा मला झिपऱ्या कमी कर म्हणायचे. राजकीय वजन वाढवत जा. शारीरिक वजन कमी कर असं बोलायचे, अशी आठवण सांगताना रोहित पवार भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर बोलताना आता मी जो लढा लढतोय, या लढ्याबद्दल दादाही मला शाबासकी देतील, असे म्हणत दादांच्या मृत्यूबद्दल आरोपींना तुरूंगात टाकल्याशिवाय हा लढा थांबणार नाही, असा निश्चयही त्यांनी व्यक्त केला.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts