Imtiaz Jaleel Maharashtra Statement : महापालिका निवडणुकीत ऐनवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने तिकिट नाकारल्याने एमआयएमच्या तिकिटावर निवडणून आलेली सहर शेख सध्या राज्यातील चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. विजयी झाल्यानंतर त्यांनी कैसे हराया? म्हणत आमदार जितेंद्र आव्हाड यांना चांगलंच डिवचलं होतं, त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. यावेळी तिच्याकडून एक वादग्रस्त विधान करण्यात आलं होतं, मुंब्राला हिरवा करायचं आहे, अशा अशयाचं ते विधान होतं. यावरून चांगलाच वाद निर्माण झाला. या वक्तव्या प्रकरणात पोलिसांनी सहर शेख यांना नोटीस देखील बजावली होती. त्यानंतर आता एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी आज सहर शेख यांच्यासह मुब्यातील नवनिर्वाचित नगरसेवकांची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी मोठं विधान केलं आहे. ‘येत्या काळात मुंब्राच नाही तर महाराष्ट्रात हिरवा रंग पसरवू,’ असं जलील यांनी म्हटलं आहे. जलील यांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा वाद होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.
पक्ष पूर्णपणे सहर शेख यांच्या पाठिशी उभा आहे – इम्तियाज जलील
पक्ष पूर्णपणे सहर शेख यांच्या पाठिशी उभा आहे. तुम्ही जर पोलीस येणार आहेत, पोलीस आले आहेत, असं म्हणून सहर शेख यांच्यावर जर दबाव निर्माण करत असाल तर आजपासून सहर शेख यांचं हे विधान इथेच संपलं आहे. मी स्टेटमेंट देतो, तुम्ही सहर शेख यांना एक छोटी मुलगी समजून त्यांच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत होतात, पण आता मी म्हणतो, माझ्याविरोधात काय कारवाई करायची ती करा, असा इशाराच यावेळी इम्तियाज जलील यांनी दिला आहे.
दरम्यान एक पत्र व्हायरल झालं आहे, जे पत्र किरीट सोमय्या यांना पोलिसांनी पाठवलेल्या पत्राची कॉपी आहे, ज्यामध्ये पोलिसांनी असं म्हटलं आहे की, सहर शेख यांना पाठवलेल्या नोटीशीनंतर त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन एक स्टेटमेंट दिलं आहे. या स्टेटमेंटमध्ये आपल्या वक्तव्याबद्दल सहर यांनी माफी मागितली आहे, असा प्रश्नही यावेळी जलील यांना विचारण्यात आला.
कोणत्याही प्रकारे आपल्याला माफी मागायची नाहीये
या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना जलील म्हणाले, मी या प्रकरणात सहर शेख यांना प्रश्न विचारला होता, आणि मी त्यांना हे देखील स्पष्टपणे सांगितलं होतं की कोणत्याही प्रकारे आपल्याला माफी मागायची नाहीये. आणि त्यांनी जे स्टेटमेंट दिलं आहे, त्यामध्ये त्यांनी म्हटलं की मुंब्राला हिरवं करायचं आहे, जसं की नाशिकमध्ये गिरीश महाजन हे हिरव्याला कापण्याची तयारी करत होते, महाराज यांना नाशिकमध्ये हिरवा रंगच नको होता.
मात्र त्यावेळी संपूर्ण नाशिक एकवटलं आणि म्हणाले नाही साहेब आम्हाला हिरवा रंग वाचवायचा आहे, आम्हाला झाडं वाचवायचे आहेत. मग तुम्ही सहर शेख यांच्या या विधानाला या दृष्ट्रीकोणातून का पहात नाहीत? तुम्हाला तर हिरवा हा शब्द असा लागला जसं की तो काही दहशतवादी शब्द आहे, असं यावेळी इम्तियाच जलील यांनी म्हटलं आहे.












