Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • शाई पुसून गैरकृत्य करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
Mumbai

शाई पुसून गैरकृत्य करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

Legal Action for Voting Ink Removal

Legal Action for Voting Ink Removal : 29 महापालिकांमध्ये आज मतदान पार पडत आहे. आज सकाळपासून मतदानाला सुरुवा झाली. सर्वसामान्य नागरिकांपासून ते राजकीय नेत्यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. आज सकाळी 7.30 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत निवडणूक पार पडणार आहे. यंदा निवडणुकीत शाईचा वापर करण्यात आला नसून मार्कर पेनचा वापर करण्यात आला. मी,अर्कार पेनची शा निघत असल्याचा दावा करण्यात आला. यावर अनेक राजकीय नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. आता याबाबत निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे.

बोटावर लावण्यात येणारी शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणे करू नका. हे गैरकृत्य आहे. याशिवाय बोटावरची शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदान करण्यासाठी आल्याचे जर निदर्शनास आल्यास त्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने दिले आहे.

सतर्कता बाळगण्याच्या दिल्या सूचना

जर बोटावर लावण्यात आलेली शाई पुसून जर कोणी गैरकृत्य करण्याचा प्रकार करत असेल तरीही त्या मतदाराला पुन्हा मतदान करता येऊ शकत नाही, यासंदर्भात दक्षता घेण्यात आली आहे. जेव्हा मतदान होते तेव्हा मतदाराने मतदान केल्यावर नोंद घेण्यात येते. म्हणूनच फक्त शाई पुसून गैरकृत्य केलेल्या मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही. असं निवडणुक आयोग म्हणाले. तसेच याबाबत सतर्कता बाळगण्याच्या सूचना पुन्हा एकदा देण्यात आल्या आहेत.

निवडणूक आयोगाने केले आवाहन

राज्य निवडणूक आयोगाने मतदानासाठी मतदाराच्या बोटाला शाई लावण्यासाठी मार्कर पेनच्या वापराबाबत 19 नोव्हेंबर 2011 ते 28 नोव्हेंबर 2011 रोजी आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. तेव्हापासून स्थानिक स्वराज्‍य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदाराच्या बोटाला शाई लावण्यासाठी मार्कर पेनचा वापर केला जातो. या आदेशान्वये मतदाराच्या बोटावर ठळकपणे उमटेल, अशा पद्धतीने मार्कर पेनने शाई लावावी; एवढेच नाही तर नखावर आणि नखाच्या वरच्या बाजुला त्वचेवर तीन- चार वेळा घासून शाई लावण्यात यावी, अशा सूचना या अगोदर देखील देण्यात आल्या असून आणि त्या मार्कर पेनवरही नमूद आहेत. त्यानुषंगाने शाई पुसण्याचा प्रयत्न करण्याचे गैरकृत्य करू नये, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts