Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • तुम्हाला माहिती आहे का ? मतदान केलेल्या मतदारांच्या तर्जनीलाच का लावली जाते शाई
लाईफस्टाईल

तुम्हाला माहिती आहे का ? मतदान केलेल्या मतदारांच्या तर्जनीलाच का लावली जाते शाई

Why Ink Applied on Index Finger of Voters

Why Ink Applied on Index Finger of Voters : 15 जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर आज म्हणजेच 16 जानेवारी रोजी 29 महापलिकांपैकी काही महापालिकांचा निकाल जाहीर झाला आहे. मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मतदारांच्या बोटावर निळ्या रंगाची शाई लावली जाते. ज्यामुळे आपण मतदानाचा हक्क बजावल्याचे सर्वांना समजते. ही शाई काही केल्या किमान एक आठवडा तरी निघत नाही. परंतु तुम्हाला माहिती आहे का ? ही शाई पहिल्या बोटाला म्हणजेच तर्जनीलाच का लावली जाते ? जाणून घेऊया आजच्या या लेखात.

राज्यात आज महापालिका निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. मुंबई, पुणे, नाशिक नागपूर सह नवी मुंबई यासह अनेक महत्वाच्या महापालिकांमध्ये मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यासह राजकीय नेत्यांपासून ते अभिनेता अभिनेत्री यांनी देखील मतदानाचा हक्क बजावली. परंतु यंदाच्या निवडणुकीत मतदारांच्या बोटाला लावण्यात आलेल्या शाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. जेव्हा कोणत्याही प्रकारची निवडणूक घेतली जाते. तेव्हा मतदारांच्या बोटावर निळ्या रंगाची शाई लावली जाते. परंतु यंदाच्या निवडणुकीत मार्कर पेनचा वापर करण्यात आला होता. आणि या मार्कर पेनाची शाई काही वेळात निघून जात असल्याचे दिसले. यामुळे नवीन वाद निर्माण झाला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने यावर स्पष्टीकरण दिले होईल.

मतदारांनी पुन्हा मतदान करू नये यासाठी लावतात शाई

जेव्हा आपण पोलिंग बुथवर मतदानासाठी जातो. तेव्हा आपल्या हाताच्या पहिल्या बोटावर म्हणजेच तर्जनीवर शाई लावण्यात येते. यासाठी शाईची बॉटल आणि ब्रश प्रत्येक कर्मचाऱ्यांकडे उपलब्ध असतो. त्यावेळी त्या ब्रशच्या माध्यमातून बोटावर शाई लावली जाते. याबाबत निवडणूक आयोगाकडून काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातात. कोणत्याही मतदारांनी पुन्हा मतदान करू नये तसेच मतदानाच्या आकडेवारीमध्ये फसवणूक करण्यात येऊ नये. यासाठी मतदान करणाऱ्या मतदाराच्या तर्जनी बोटावर शाई लावण्यात येते. एकदा बोटावर लावलेली शाई सहजरित्या पुसता येत नसून किमान एक आठवडाभर तरी मतदाराच्या बोटावर ही शाई टिकून राहते.

डावा हा नसेल तर कशी आणि कुठे लावली जाते शाई

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल डाव्या हाताच्या तर्जनीवरच का लावतात शाई असा सवाल तुम्हाला पडला असेल. तर उजव्या हाताच्या बोटावर शाई लावल्यास ती शाई जेवताना तुमच्या पोटात जाऊ शकते. यामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम उद्भवू शकतात. त्यामुळे डाव्या हाताच्या बोटावरच शाई लावली जाते. याशिवाय जर एखाद्या व्यक्तीला डाव्या हातावर तर्जनी नसेल किंवा डावा हात नसेल तर उजव्या हाताच्या कोणत्याही बोटावर शाई लावण्यास परवानगी दिली जाते. या शाईचा महत्वाचा उद्देश फक्त एखाद्या व्यक्तीने मतदानाचा हक्क बजावलेला आहे हे ओळखणे. हा आहे. जर एखाद्या व्यक्तीला दोन्ही हात नसेल तर त्या व्यक्तीच्या पायाच्या अंगठयावर मतदानाची शाई लावली जाते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts

हळदाची पाने : आयुर्वेदिक गुणांचा अनमोल खजिना हल्लीम (Garden Cress Seeds): आरोग्यासाठी नैसर्गिक सुपरफूड स्नायूंची ताकद वाढवायची? रोज खा हे ७ प्रोटीन सुपरफूड्स! स्ट्रॉबेरी: गोड लाल आरोग्यदायी फळ सुंठ (Dry Ginger): आरोग्याचा खजिना