Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • मुंबईतील कोळी समाज एकवटला, फक्त कोळी उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन
Top News

मुंबईतील कोळी समाज एकवटला, फक्त कोळी उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन

Mumbai Koli Community Vote Appeal
3

Mumbai Koli Community Vote Appeal : राज्यातील २९ महापालिकांसाठी उद्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पद्धतीने मतदारांना आवाहन करण्यात येत आहे. त्यातच आता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने कोळी समाजाला पक्षभेद बाजूला ठेवून केवळ कोळी उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन केलेय. त्यामुळे कोळी समाजाचे उमेदवार कोणत्या पक्षात जास्त आहेत त्या पक्षाला मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा – जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकला, ओबीसीच्या मोठ्या नेत्याची निवडणूक आयोगाकडे मागणी

मुंबईतील मराठी मतदारांपैकी सुमारे एक तृतीयांश मतदार कोळी समाजाचे असल्याने ही मतदारशक्ती एकवटली, तर मुंबई महानगरपालिकेत कोळी समाजाचे प्रभावी प्रतिनिधित्व उभे राहू शकते, असं अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिताने नमूद केलं आहे.

मागील मनपा निवडणुकीत कोळी समाजाला केवळ तीन उमेदवारी मिळाल्या होत्या; यंदा मात्र १३ कोळी उमेदवार निवडणूक लढवत आहेत. ही संधी समाजाने वाया घालवू नये असे आवाहन समितीने केले आहे.

कोळीवाड्यांसाठी अपुरी आर्थिक तरतूद, मासळी मंड्यांची दुर्दशा, बाजारांचे जबरदस्तीने स्थलांतर, जेट्टींची दुरवस्था आणि कोळी वसाहतींचे सातत्याने दुर्लक्षित करण्यात आलंय. ही कोळी समाजाच्या प्रश्नांची काही उदाहरणे असल्याचे मच्छिमार कृती समितीनं सांगितलं आहे.  

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts