Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार- अजित पवारांनी केलं जाहीर
Pune

पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार- अजित पवारांनी केलं जाहीर

Ajit Pawar addressing the media while announcing that both NCP factions will contest together in Pimpri-Chinchwad

NCP unity Pimpri Chinchwad : सार्वत्रिक महापालिका  निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राजकारणात नाराजी नाट्य बघायला मिळत आहे. या निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांमध्ये बैठक पार पडल्या. या बैठकीत कधी अजित पवार नाराज दिसले तर कधी दुसरे कोणीतरी नाराज दिसले. काही दिवसांपूर्वी पुण्यातील पिंपरी चिंचवड महापालिकेतून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकत्र लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. परंतु याबाबत अधिकृत माहिती कोणालाच नव्हती. आता पिंपरी चिंचवड मध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले आहे.

घड्याळ आणि तुतारी एकत्र लढताना दिसणार

पिंपरी- चिंचवडमध्ये राष्ट्रवादी पक्ष म्हणजे घड्याळ आणि तुतारी एकत्र लढताना दिसणार आहेत. म्हणजे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि जित पवार पक्ष तथा काका पुतणे हा परिवार पुन्हा एकत्र लढणार आहे. या दोन्ही पक्षाने एकत्र यावे हे बऱ्याच जणांच्या मनात होते. आता अजित पवार यांनी स्वतः पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार असल्याचे जाहीर केले आहे. या निर्णयामुळे आता सर्वात मोठा धक्का हा महाविकास आघाडीला बसला आहे. कारण शरद पवार गट हा महाविकास आघाडीचा महत्वाचा भाग होता. परंतु अजित पवारांनी महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला.

128 जागेपैकी 110 जागा अजित पवार गटाला

अजित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची घोषणा करताच भाजप, शिवसेना शिंदे गट, आरपीआय यांची स्वतंत्र युती जाहीर करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. आता पिंपरी चिंचवड मध्ये दोन्ही राष्ट्रवादी विरुद्ध भाजप शिवसेना शिंदे गट आरपीआय युती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत बघायला मिळेल. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 128 जागेपैकी 110 जागा अजित पवार गट, शरद पवार गटाला 18 जागा देण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी काही गोष्टी कराव्या लागत आहेत. पुढे मागे करून जागावाटप केले आहे. येणाऱ्या दोन दिवसात तुम्हाला कळेल असं अजित पवार म्हणालेत.

हे ही वाचा : उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर; पहाटेच चहाचा आस्वाद घेत विकासकामांची पाहणी

या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरु होती. आधी ही चर्चा फिस्कटली होती. त्यानंतर आमदार रोहित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. त्यानंतर पुन्हा दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. आता स्वत: अजित पवार यांनीची दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत निवडणुका लढणार असल्याची घोषणा केली आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts