Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार ? नाराजी नाट्य सुरु
Top News

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार ? नाराजी नाट्य सुरु

NCP leaders during a political meeting in Pune as discussions over unity between both factions intensify

NCP unity in Pune : पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या बैठकीवरून नाराजी नाट्य सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सुरु असलेल्या बैठकीतून अजित पवार अचानक गायब झाले. परंतु बारामतीत 28 डिसेंबर रोजी एका कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

बारामतीत विद्यानगरी येथे 28 डिसेंबरला शरद पवार सेंटर ऑफ एक्सलंन्स इन आर्टिफिशियल विभागाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन पार पडणार आहे. यावेळी देशाचे प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते या नूतन वास्तूचे उद्घाटन समारंभ पार पडणार आहे. यावेळी शरद पवार आणि अजित पवार सुप्रिया सुळे, राज्यसभेचे खासदार सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार यांसह संपूर्ण कुटुंब एकत्र येणार असल्याची चर्चा आहे.

हे ही वाचा : कबुतरांना दाणे टाकणे पडले महागात; देशातील पहिली शिक्षा

या कार्यक्रमाच्या दरम्यान राजकारणातील मोठे नेते मानले जाणारे शरद पवार आणि अजित पवार तसेच खासदार सुप्रिया सुळे आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार यांची राजकीय बैठक होणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे.

परंतु पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी महानगरपालिका आणि इतर निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर एकत्र येण्याची बैठक मोडखळीत आली असली तरी 28 डिसेंबर रोजी बारामतीत विद्यानगरी येथे राजकारणातील मोठे नेते मानले जाणारे शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार आणि युगेंद्र पवार यांसह दोन्ही राष्ट्रवादीची बैठक होणार असून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts