Supriya Sule on NOTA : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या बिनविरोध निवडी लोकशाहीसाठी घातक असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.NOTA चा पर्याय असूनही मतदारांना मतदानापासून वंचित ठेवले जात आहे, असा आरोप त्यांनी केला. त्याविरोधात संसदेत आवाज उठवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा – दोन माजी महापौर शिंदे सेनेच्या गळाला, एकनाथ शिंदेच्या हस्ते पक्षप्रवेश
निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप
निवडणुकांदरम्यान धमकी, दहशत, पैशांचा वापर, उमेदवारी अर्ज माघारीसाठी दबाव, ब्लॅकमेलिंग, बोगस मतदान व मतदारांना दिली जाणारी प्रलोभने अशा गंभीर प्रकारांचे आरोप सुप्रिया सुळे यांनी केले.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जे काही घडत आहे, ते माझ्यासह राज्यातील जनतेच्या मनाला अस्वस्थ करणारे आहे. तब्बल ७-८ वर्षांनंतर निवडणुका होत असतानाही मोठ्या प्रमाणावर बिनविरोध निवडणुका होत आहेत. NOTA चा पर्याय उपलब्ध असूनही मतदारांचा मतदानाचा अधिकार हिरावून…
— Supriya Sule (@supriya_sule) January 6, 2026
निवडणूक आयोगावर टीका
या प्रकारांकडे निवडणूक आयोगाचे होत असलेले दुर्लक्ष चिंताजनक असून, ही स्थिती सुदृढ लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचा इशारा त्यांनी दिला.
संसदेत आवाज उठवणार
या विषयावर आपण यापूर्वीही संसदेत आवाज उठवला असून, लोकशाहीच्या संरक्षणासाठी पुढेही हा मुद्दा सातत्याने संसदेत मांडणार, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.












