Asaduddin Owaisi attack on Ajit Pawar : सध्या राज्यात २९ महापालिकांची रणधुमाळी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष प्रचारात व्यक्त आहेत. एकमेकांच्या पक्षावर आणि नेत्यावर आरोप केले आज आहे. सोलापूर महापालिकेच्या प्रचारार्थ एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी महाराष्ट्रातील अनेक नेत्यांवर टिकेची झोड डागली. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच तू मारल्यासारखे करायचं मी रडल्यासारखं करतो असं सुरू आहे. मुंबईत ते तिघे मिळून मलई खातात. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार भाजपविरोधात बोलले आणि नंतर संध्याकाळी फोन आला की लगेच नरमले. माझे नाव असदुद्दीन ओवैसी आहे, असले ५६ अजित पवार मी खिशात घेऊन फिरतो असं आव्हान त्यांनी यावेळी अजित पवारांनी दिलं आहे. त्यामुळे अजित पवार आणि ओवैसी वाद सुरू होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
एमएमएमचे प्रदेश कार्याध्यक्ष फारूक शाब्दी यांनी राजीनामी दिला आहे. त्याचा उल्लेख करत ओवेसी यांनी सोलापुरातील पक्षात कोणी नाराज असेल तर मी त्यांच्या घरी जाईन, मी फारूक शाब्दी यांचा राजीनामी स्वीकारलेला नाही. जोपर्यंत मी त्यांच्या कुटूंबातील लोकांशी बोलत नाही, तोपर्यंत मी राजीनामी स्विकारणार नाही, असे ओवेसी म्हणाले. यावेळी अजित पवार यांच्यावर ओवेसी यांनी जोरदार टीकास्त्र डागले आहे.
हेही वाचा – ‘तुमको मिरची लगी तो मैं क्या करू’; देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना ठणकावून सांगितलं
आंदोलनावेळी माझ्यावर लाठीचार्ज झाला त्यावेळी माझे ४ बोटे तुटली, डोक्यात १८ टाके पडले आणि मणक्यात गॅप पडला. त्यावेळी माझ्या वडिलांनी याबद्दल बंद पुकारला नाही. त्यामुळे मी नसलो तरी तुम्ही एमआयएमला मतदान करणार की नाही, असा सवाल असदुद्दीन ओवेसी यांनी उपस्थितांना केला. एमआयएमला पक्षाचा राजीनामा दिलेल्या फारूक शाब्दी यांचा उल्लेख करत ते म्हणाले की, ७९० वोट घेतलेला मला धमकावतो काय? मी शुक्रवारची नमाज तुझ्या गल्लीत येऊन करतो, असे आव्हान असदुद्दीन योवैसी यांनी शाब्दी यांना दिले. तुझ्या घरातील लोकं एमआयएमला मतं टाकतील त्यामुळे मस्ती करू नोक, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
सोलापूरात 8 दिवसातून एकदा पाणी येते
गुजरातमध्ये पेट्रोल 97 रुपये आणि सोलापुरात 104 रुपये आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची कोणासाठी सेटिंग सुरु आहे. महाराष्ट्रातील पेट्रोलचे दर थोडे कमी करा. अजित पवार म्हणाले होते धरणात मुतू का? अजित पवार सोलापूरला आलेला निधी कुठे गेला? सोलापुरात मन्सूरी कुटुंबातील 10 लोकं जळून मेले. सोलापूरात 8 दिवसातून एकदा पाणी येते आणि मोदी म्हणतात ‘नल से जल, जल से नल‘ अशी टीका ओवैसी यांनी यावेळी केली.
सोलापूर महापालिकेचे 1300 कोटी बजेट आहे
सोलापूरातील महिलांचे मी कौतुक करतो की त्या पहाटे 2 वाजता पाणी भरण्यासाठी उठतात. सोलापूर महापालिकेचे 1300 कोटी बजेट आहे, मग पैसे कुठे जातात असा सवाल ओवैसी यांनी यावेळी केला. अजित पवारना व्होट म्हणजे मोदीना व्होट त्यामुळे तुम्ही अजित पवारना मतं देणार का? त्या दोन नंबर धंदे करणाऱ्याला (तौफिक शेख) व्होट देणार का? असाही सवाल ओवैसी यांनी केला.
तू मारल्यासारखे करायचे आणि मी रडल्यासारखे करतो
अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचं तू मारल्यासारखे करायचे आणि मी रडल्यासारखे करतो असे सुरु आहे. मात्र मुंबईत हे तिघे एकत्र मिळून मलई खातात. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार भाजपविरोधात बोलले आणि नंतर संध्याकाळी फोन आला की लगेच नरमले. माझे नाव असदुद्दीन ओवैसी आहे, असले 56 अजित पवार मी खिशात घेऊन फिरतो असे आव्हान त्यांनी यावेळी अजित पवारांना दिले.
भाजप सत्तेत आल्यापासून देशात मॉब लिंचिंग वाढले
संसदेत वक्फ बोर्ड कायदा होताना अजित पवारांनी त्याला पाठिंबा दिला होता. भाजप सत्तेत आल्यापासून देशात मॉब लिंचिंग वाढले आहे. एका बीएसएफ जवानाच्या मुलाला पिंकी पिंकी म्हणून जीव मारले. देशात अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या त्यावर अजित पवार काही बोलले का? असेही यावेळी ओवैसी म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प मोदींवर एवढे बोलतात, पण देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार ट्रम्प विरोधात बोलत नाहीत असेही ते म्हणाले.












