Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • पवारांच्या निष्ठावंताने साथ सोडली! जगताप यांच्या राजीनाम्याने पुण्यात हादरा
Top News

पवारांच्या निष्ठावंताने साथ सोडली! जगताप यांच्या राजीनाम्याने पुण्यात हादरा

Prashant Jagtap resignation

Prashant Jagtap resignation  : पुण्यात शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. कारण निष्ठावंत शिलेदाराने ऐन निवडणुकीच्या काळात साथ सोडलीय. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्त्वाचा राजीनामी दिला आहे. पत्रकार परिषद घेत जगताप यांनी याबाबतची माहिती दिलीय. पक्षाने दिलेल्या संधीबद्दल त्यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले आहेत.

राज्यात 29 महापालिका निवडणुकांसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. मात्र त्याआधीच पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी 22 डिसेंबर रोजी त्यांच्या पदाचा तसेच पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे सुपूर्द केल्याची चर्चा होती. महत्त्वाचे म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या संभाव्य युतीला प्रशांत जगताप यांनी दर्शवलेला तीव्र विरोध त्यांच्या राजीनाम्यास कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे. तसेच दोन दिवसात आपण राजीनाम्याचा निर्णय घेणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. यानंतर आणि आज प्रशांत जगताप यांनी पुणे शहराध्यक्ष पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

हेही वाचा – महापालिकांच्या निवडणूकीसाठी काँग्रेसची फौज तयार, ४० स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध

शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे आभार – जगताप

सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज करण्याची मला संधी मिळाली. पक्षात खूप चांगल्या पद्धतीने मी कामकाज केले. हडपसर वानवडी परिसरातील नागरिकांनी मला दादा दिली. मी रस्त्यावर उतरून काम केले. हे मी पुणेकर यांच्यासाठी केले. त्यामुळे मी सर्वप्रथम शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे आभार मानतो. मी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या घरातून आलो आहे. मात्र आज मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शहराध्यक्ष पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मी शशिकांत शिंदे यांना राजीनामा पाठवला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

सामाजिक व राजकीय वाटचाल सुरूच असेल

27 वर्षांपूर्वी मी सामाजिक व राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले, तेव्हा कुठल्या पदासाठी नव्हे, तर पुरोगामी विचारांची चळवळ पुढे नेण्यासाठी मी कार्यरत झालो. आज 27 वर्षांनंतरही हेच एकमेव ध्येय माझ्या मनात आहे. यापुढेही पुरोगामी विचारांसाठी माझी सामाजिकराजकीय वाटचाल सुरूच असेल असे जगताप म्हणाले. आजपर्यंत अत्यंत निष्ठेने मला साथ देणाऱ्या, यापुढेही संघर्षाच्या वाटेवर माझ्यासोबत येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार जगताप यांनी मानले.

नगरसेवक पदाची निवडणूक लढवणार

एका पराभवामुळे भीती बाळगणारा मी नाही. विधानसभेत मी हरलो पण मला तिथल्या सगळ्या लोकांच्या प्रती मला आदर आणि मान असल्याचे जगताप यावेळी म्हणाले. पार्टी कशी निवडणूक लढवेल याची मी तयारी केली होती. माझ्यासारखा कार्यकर्ता व्यथित झाला होता. माझ्या मनात विचारांची घालमेल होती. पण घालमेल माझ्या आयुष्यावर उलटल्याचे प्रशांत जगताप म्हणाले. सद्विवेक बुद्धीला जागरूक ठेवून आणि सगळे प्रसंग डोळ्यासमोर ठेऊन आणि सगळ्या नेत्यांचा मान ठेऊन मी शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन बाहेर पडत आहे. मी राजकारणातून बाहेर गेलो नाही असेही त्यांनी सांगितले. मी राजीनामा शशिकांत शिंदे यांना मेल केला आहे. नगरसेवक पदाची निवडणूक मी लढवणार असल्याचे प्रशांत जगताप यांनी सांगितले.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts