पुणे : पुणे शहरातील वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांना शनिवारी लोहगाव येथे एका कार्यक्रमादरम्यान मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार पठारे हे लोहगाव परिसरात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटातील काही कार्यकर्त्यांसोबत त्यांचा वाद झाला. आणि या वादाचे नंतर काही वेळातच जोरदार हाणामारीत रूपांतर झाले.
मारहाणीच्या घटनेत आमदार पठारे यांना किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, कार्यक्रमस्थळी गोंधळ उडाल्याने पोलिसांना तातडीने हस्तक्षेप करावा लागला. सध्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, एक दिलासादायक बाब म्हणजे, यामध्ये किरकोळ वादावादी झाली होती. कोणतीही मारहाण झालेली नाही. फक्त धक्काबुक्की करण्यात आली. आता हे प्रकरण शांत झाले असल्याची माहिती बाप्पू पठारे यांनी दिली आहे.